शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी महिलेचा घरापर्यंत पाठलाग करत अश्लील चाळे; गुन्हा नोंदवत आरोपीला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:14 IST

मैत्रिणीच्या मुलाने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परदेशातून कुलाब्यातील मैत्रिणीकडे राहण्यास आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा घरापर्यंत पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. कुलाबा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत आरोपीला तत्काळ अटक केली. नुरेन मोहम्मद खालिद (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गोवंडीचा रहिवासी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला खालिद कपडे शिलाईचे काम करतो. गेल्या चार महिन्यांपासून तो मुंबईत आला आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास परदेशी महिलेचा खालिदने कुलाब्यातील घरापर्यंत पाठलाग करत अश्लील चाळे केले. महिलेने घाबरून आतून दरवाजा लावून घेताच आरोपीने बाहेरून दरवाजाची कडी लावली. घडलेला प्रकार मैत्रिणीच्या कुटुंबीयांना सांगताच त्यांनाही धक्का बसला. तिला तक्रार देण्यासाठी सांगताच तिने नकार दिला. अखेर मैत्रिणीच्या मुलाने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

कुलाबा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने खालिदला अटक केली. त्याने अशाच प्रकारे आणखी काही परदेशी पर्यटक महिलांना टार्गेट करत पाठलाग केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी