शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणच शेत खाते तेव्हा...पोलिसानेच विकल्या करोडो रुपयांच्या विदेशी सिगारेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 18:49 IST

वसई न्यायालयात हजर केल्यावर १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देया अटक पोलिसाचे नाव शरीफ रमजान शेख असं आहे. पथकाने ३ करोड २४ लाख रुपये किंमतीच्या विदेशी सिगारेट जप्त केल्या होत्या. २ करोड १६ लाख रुपयांच्या १०० सिगारेटच्या गोण्या आढळून न आल्याने सर्वत्र खळबळ माजली.

नालासोपारा - वालीव पोलीस ठाण्यामधील मुद्देमाल कारकून असलेल्या सहाय्यक फौजदाराला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याने जप्त केलेल्या मुद्देमालामधील करोडो रुपयांचे विदेशी सिगारेट चोरी करत विकल्याचा महाप्रताप केल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपी पोलिसाविरोधात वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या असून त्याला वसई न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे. या अटक पोलिसाचे नाव शरीफ रमजान शेख असं आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये डिसेंबर २०१८ रोजी पोलीस उपनिरीक्षक विनायक माने आणि त्यांच्या पथकाने ३ करोड २४ लाख रुपये किंमतीच्या विदेशी सिगारेट जप्त केल्या होत्या. हा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत मुद्देमाल टेम्पोसह जप्त करण्यात आला होता. टेम्पो मालकाने टेम्पो परत मिळावा म्हणून वसई न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी करून टेम्पो परत देण्याचे आदेश वालीव पोलिसांना दिल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हा सदर टेम्पोमध्ये १५० गोण्यांमध्ये विदेशी सिगारेट होत्या. मात्र, टेम्पो परत देताना ५० गोण्याच सिगारेट आढळून आल्या. २ करोड १६ लाख रुपयांच्या १०० सिगारेटच्या गोण्या आढळून न आल्याने सर्वत्र खळबळ माजली. पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी बुधवारी गुन्हा दाखल करून मुद्देमाल कारकून सहाय्यक फौजदार शरीफ रमजान शेख याला अटक केले. वसई न्यायालयात हजर केल्यावर १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चोरीचा माल पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरी झाल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या चोरी प्रकरणामध्ये याचे कोणी साथीदार आहेत का ? वालीव पोलीस ठाण्यातील कोणी अधिकारी व कर्मचारी सामील आहे का याचा शोध घेत तपास वसईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. आश्विनी पाटील तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसCigaretteसिगारेट