शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणं ठरणार बलात्कार? सुप्रीम कोर्ट घेणार कायद्याचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:19 IST

Marital Rape Case : याला गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक महिला संघटना वर्षानुवर्षे करत आहेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

नवी दिल्ली : पत्नी आपल्या पतीवर बलात्काराचा दावा करू शकते का याचा आढावा सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. म्हणजेच पतीला पत्नीवर जबरदस्ती करण्याचा अधिकार आहे का? सध्याच्या कायद्यानुसार पत्नी आपल्या पतीवर बलात्काराचा दावा करू शकत नाही. पुरुषाला आपल्या पत्नीशी मनाप्रमाणे संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. वैवाहिक बलात्कार म्हणजेच वैवाहिक जीवनात जबरदस्तीने संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जात नाही. याला गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक महिला संघटना वर्षानुवर्षे करत आहेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कर्नाटकातील एका प्रकरणात नोटीस बजावली आणि राज्य सरकारकडून उत्तर मागवले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे. खरं तर, कर्नाटकातील एका विवाहित पुरुषावर त्याच्या पत्नीने बलात्काराचा आरोप केला होता, ज्यावर ट्रायल कोर्टाने आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आरोपीने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने आरोपीला त्याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याला सामोरे जाण्याचे निर्देशही दिले होते.२९ मे पासून कनिष्ठ न्यायालयात खटल्याची कार्यवाही सुरू होणार आहे. या विरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कायद्यानुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे पतीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती द्यावी. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती दिली नाही, परंतु याचिकाकर्त्याला या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची माहिती कनिष्ठ न्यायालयाला देण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालय आता या कायद्याचा आढावा घेणार आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnatakकर्नाटकCourtन्यायालय