शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आफताबचे पहाटे बॅग नेतानाचे फुटेज सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 06:22 IST

श्रद्धाचा मित्र गॉडविनची पोलिसांनी चौकशी केली. यात गॉडविनने सांगितले की, आफताबने नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला मारहाण केली होती.

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांना आता १८ ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. यात पहाटे चार वाजता आफताब बॅग घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांना असा संशय आहे की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठीच तो गेला होता. या क्लिपमध्ये दिसत आहे की, त्या रात्री त्याने तीन चकरा मारल्या होता. पोलिसांनी फ्लॅटमधील सर्व कपडे जप्त केले आहेत. यात श्रद्धाचे कपडेही आहेत. ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पोलिसांनी सांगितले की, हत्या झाली त्या दिवशी जे कपडे परिधान केले होते ते अद्याप मिळालेले नाहीत. 

आफताबविरुद्ध २०२० मध्ये तक्रार श्रद्धाचा मित्र गॉडविनची पोलिसांनी चौकशी केली. यात गॉडविनने सांगितले की, आफताबने नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला मारहाण केली होती. त्यावेळी ती कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. माझा भाऊही तिथे काम करत होता. श्रद्धाने बॉसला हे सांगितल्यानंतर बॉसने भावाला तिची मदत करण्यास सांगितले. त्यावर मी श्रद्धाला घेऊन नालासोपाऱ्याच्या पोलिस ठाण्यात गेलो होतो व तिथे तक्रार देण्यात आली. त्यानंतर आफताबने असे नाटक केले की, श्रद्धाने तक्रार मागे घेतली नाही तर आत्महत्या करीन. त्यानंतर श्रद्धाने तक्रार मागे घेतली.    

पोलिसांना हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताबने पहाटेच्या सुमारास तीन वेळा चकरा मारल्याचे दिसून आले आहे. पुरावे गोळा करताना हा व्हिडीओ पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

ॲड. उज्ज्वल निकम लढवणार श्रद्धाचा खटलायाप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिली. मुंबई दौऱ्यावर असलेले बिर्ला यांची डॉ. गोऱ्हे यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी केली होती. त्यावर त्यांनी त्वरित संमती देत याबाबत कार्यवाही करीत असल्याचे सांगितले होते. आरोपीला फाशीची सुनावण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी या निवेदनामध्ये त्यांनी केली होती. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी