शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच सराईत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 17:01 IST

एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले.

ठळक मुद्देवाकड पोलिसांची कारवाई : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

पिंपरी : एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून चारचाकी मोटारसह २ पिस्टल, ३ जिवंत राऊंड, कोयता, स्टील रॉड हस्तगत करण्यात आला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. पाचही आरोपींवर अनेक पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश बापु शिंदे (वय ३२, रा. वाकड, मुळगाव श्रीरामपूर, जि. अहमदनगर), प्रमोद संजय सवने (वय २९, रा. वाकड), भैय्या उर्फ सचिन बबन जानकर (वय २६, रा. वाकड), नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय ३२, रा. वाकड), रामकृष्ण सोमनाथ सानप (वय ३०, रा. वाकड, मुळगाव रामेश्वर वस्ती, ता. भुम, जि. उस्मानाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना बातमीमार्फत बातमी मिळाली की, काही जण काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकणार असून त्यांच्याकडे पिस्टल व कोयत्यासारखी घातक हत्यारे आहेत. त्यानुसार काळेवाडी येथील बीआराटी रस्त्याच्या कडेला चारचाकी मोटारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे २ लोखंडी पिस्टल, ३ जीवंत राऊंड, लोखंडी कोयता, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, स्टील रॉड, ५ मोबाईल हॅन्डसेट व चारचाकी मोटार (क्र. एमएच १४ सीके ११६१) असा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपी दुर्गेश शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०११ पासून जबरी चोरी, घरफोडी चोरी तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे इत्यादी असे ९ गुन्हे दाखल आहेत.आरोपी भैय्या उर्फ  सचिन जानकर वाकड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०१५ पासून गंभीर दुखापत, विनयभंग, दंगा करणे, असे ५ गुन्हे दाखल आहेत.आरोपी नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे याच्यावर कोथरुड व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी रामकृष्ण सोमनाथ सानप याच्यावर भूम व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रमोद संजय सवने याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरिश माने, सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दीपक भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांनी कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक