शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 20:56 IST

१९ जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वाडीया पुलाखाली ही घटना घडली. 

पुणे :  दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पुणे लोहमार्ग पोलिसांनीअटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.  पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चाकु, एक स्टीलचा रॉड, दोरी, मिरची पुड जप्त केली.  योगेश विश्वासराव पाचडे (वय ३०), शिवा गुलाबराव वानखेडे (वय २२), आशिष श्रीकृष्ण कानपुरे (वय २३, तिघे रा. राजन्दा, जि. अकोला), आकाश अंबादास राजगुरू (वय २४, रा. पिंपरी, जि. बीड), पंकज मुन्ना यादव (वय १९, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सुदर्शन केशव इप्पर यांनी फिर्याद दिली आहे. १९ जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वाडीया पुलाखाली ही घटना घडली. वाडीया पुलाखाली काही जण असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती इप्पर यांना मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईमध्ये पुलाखाली सहा जण मिळून आले. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पाच जणांना न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का?, त्यांच्यावर गुन्हे दाखल असून त्याबाबत तपास करण्यासाठी, त्यांनी अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.  

टॅग्स :PuneपुणेArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस