शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील नोटांच्या छापखान्यातून लाखोंची रोकड गायब, कडक सुरक्षाव्यवस्थेला भगदाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:57 IST

Nashik's currency note press: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयात पाचशेच्या नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे तेथील व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ व्यवस्थापनाने तपासाची सुत्रे फिरविली. पाचशेच्या नोटांचे बंडलमध्ये पाच लाखांची रोकड गहाळ झाली की चोरी याचा तपास सुरु केला.

नाशिक : भारत सरकारच्या नाशिकरोड येथील जेलरोड भागात असलेल्या चलार्थपत्र मुद्रणालयातून सुमारे पाच लाखांची रोकड चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार चार महिन्यानंतर उजेडात आला आहे. पाचशेच्या चलनी नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे मुद्रणालय व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोध घेतला जात होता. तसेच अंतर्गत चौकशी समिती गठीत करत तपास केला जात होता. दरम्यान, रोकड मिळून न आल्यामुळे अखेर चौकशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेत मंगळवारी (दि.१३) तक्रार अर्ज दिला. (Five lakh cash disappears from Nashik's currency note press)

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयात पाचशेच्या नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे तेथील व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ व्यवस्थापनाने तपासाची सुत्रे फिरविली. पाचशेच्या नोटांचे बंडलमध्ये पाच लाखांची रोकड गहाळ झाली की चोरी याचा तपास सुरु केला. दरम्यान, बहुतांश कर्मचाऱ्यांची चौकशीदेखील करण्यातआली. तसेच जाबजबाबही घेतले गेले. इमारतीच्या आवारात नोटांच्या बंडलचा शोधही घेतला गेला; मात्र कोठेही नोटांचे बंडल मिळून आले नाही. दरम्यान, गेली पाच महिने मुद्रणालयाच्या फॅक्ट फाइन्डींग समितीकडून याबाबत तपास केला जात होता. या समितीने सर्व चौकशी पुर्ण करत त्यांचा चौकशी अहवाल उपनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा सादर केला. तसेच मुद्रणालयातून पाच लाखांच्या रोकडचा अपहाराबद्दल तक्रार अर्जही दिला असून यासंदर्भात चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची कडक सुरक्षाव्यवस्था असतानासुध्दा अशाप्रकारे इतकी मोठी रक्कम मुद्रणालयातून कशी गायब झाली? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या घटनेची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती. मुद्रणालयाच्या सुरक्षाव्यवस्थेला या घटनेमुळे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.  

पाचशेच्या नोटांचे दहा बंडल सापडेनातमुद्रणालयात छापल्या जाणाऱ्या भारतीय चलनाच्या नोटांपैकी पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचे १० बंडल फेब्रुवारी महिन्यापासून गायब झाले आहेत. ही रोकड सुमारे पाच लाख रुपयांच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे. कडक सुरक्षाव्यवस्था भेदून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम कशी लांबविली गेली? याचा शोध मात्र पाच महिने उलटूनही गोपनीयरित्या सुरु असलेल्या चौकशी समितीला लागू शकलेला नाही. दरम्यान, आता हे प्रकरण उपनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

...असा आहे इतिहासइंडिया सिक्युरिटी प्रेस अर्थात भारत प्रतिभूती मुद्रणालय ब्रिटीशकालीन असून १९२४साली इंग्रजांनी मुद्रणालयाची स्थापना केली होती. १९२८साली पहिल्यांदा येथे ५रुपयांची नोट छापली गेली होती. स्वातंत्र्यानंतर १९८०साली भारत सरकारने चलार्थपत्र मुद्रणालयाची स्थापना केली. तेव्हापासून करन्सी नोटप्रेसमध्ये 10, 20, 50, 100, 200, 500, २००० रुपयांच्या नोटा छापल्या जातात. दरवर्षी सुमारे सरासरी ४ हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी केली आहे. फॅक्ट फाईन्डींग कमिटीकडून मागील काही महिन्यांपासून गहाळ झालेल्या पाच लाखांच्या रोकडचा शोध घेतला जात आहे. कर्मचाऱ्यांचे जबाबही या समितीने नोंदविले आहे. रोकडचा तपास लागलेला नाही. समितीचा चौकशी अहवाल आणि तक्रार अर्जावरुन उपनगर पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पुढील तपासाला दिशा दिली जात आहे.-विजय खरात, पोलीस उपायुक्त, नाशिक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक