शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कै द्याकडे नशेच्या गोळ्यांसह पाचशेच्या पाच नोटा, कारागृह सुरक्षेला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:26 IST

मोक्कासारख्या गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी कैदी असलेल्या पुनीत उर्फ अजय तिवारी (३०) याच्याकडे नशेच्या सहा गोळ्या तसेच ५०० रुपयांच्या पाच नोटा असे अडीच हजार रुपये सापडल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उघडकीस आली.

ठाणे : मोक्कासारख्या गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी कैदी असलेल्या पुनीत उर्फ अजय तिवारी (३०) याच्याकडे नशेच्या सहा गोळ्या तसेच ५०० रुपयांच्या पाच नोटा असे अडीच हजार रुपये सापडल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे ठाणे कारागृहाच्या सुरक्षेला सुरुंग लागल्याची चर्चा आहे. तसेच या प्रकरणी गुरुवारी रात्री ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीकडून त्या गोळ्या आणि पैसे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गुन्ह्यातील पुनीत हा ३१ जुलै २०१२ पासून ठाणे कारागृहात न्यायबंदी कैदी आहे. गुरुवारी बॅरेक नंबर २ मध्ये असलेल्या कैद्यांमध्ये पुनीतकडे नशेच्या गोळ्या असल्याची कुजबुज सुरू होती. ती एका कारागृह कर्मचाऱ्याच्या कानांवर आली. त्यानुसार, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पांढºया रंगाच्या सहा गोळ्या एक पिशवीत मिळून आल्या. तर, दुसºया पिशवीत गुंडाळी केलेल्या ५०० रुपयांच्या पाच नोटाही मिळून आल्या. या प्रकरणी कारागृह शिपाई महेश गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुनीतविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी दिली.१५ डिसेंबर रोजी त्याला ठाणे न्यायालयात आणण्यात आले होते. त्या वेळी परतताना त्याने त्या वस्तू कारागृहात नेल्या असाव्यात. मात्र, कारागृहात नेताना प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. यामुळे त्याने या वस्तू कशा नेल्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याबाबत तपासासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याचा ताबा घेऊन त्याला अटक केली जाणार आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी