बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, महिला डॉक्टरसह पाच ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 12:01 PM2021-10-13T12:01:05+5:302021-10-13T12:01:32+5:30

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या पोलिसांनी केले जेरबंद

Five arrested for smuggling counterfeit notes | बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, महिला डॉक्टरसह पाच ताब्यात

बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, महिला डॉक्टरसह पाच ताब्यात

Next

लासलगाव (नाशिक)-पाचशे रूपयांच्या 291बनावट चलनी नोटा व्यवहारात आणऱ्या टोळीचा  पर्दाफाश  लासलगाव पोलीसांनी  केला असून एका महिला डाॅक्टरसह पाच जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लासलगावचे सहाय्यक  पोलिस  निरीक्षक  राहुल वाघ    यांनी  दिलेल्या माहितीनुसार 500 दराच्या बनावट 1 लाख पंचेचाळीस  हजार  रुपये जप्त करण्यात आले आहे.  

दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे लासलगाव येथील राहणारे  मोहन बाबुराव पाटील व डाॅ.  प्रतिभा बाबुराव घायाळ दोन्ही रा बोराडे हॉस्पीटल जवळ लासलगावव  विठ्ठल चपलाल नाबरीया रा कृषीनगर कोटमगाव रोड लासलगाव ता निफाड यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मित्र रविंद्र हिरामण राऊत रा स्मारक नगर पेठ ता पेठ जि नाशिक व विनोद मोहनभाई पटेल रा पंचवटी नाशिक हे आम्हाला सायंकाळी बनावट 500 दराच्या चलनी नोटा देणार आहे. अशी माहिती दिल्याने  पोलिस अधीक्षक  सचिन पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक  माथुरी कांगणे ,  पोलीस उपअधीक्षक  सोमनाथ तांबे  यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक  पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करन्यात आले. सदर पथकाने येवला रोड विंचुर येथे सापळा रचुन मोहन पाटील , प्रतिभा घायाळ , विठठल नावरीया यांना बनावट 500 दराच्या 291 नोटा देण्यासाठी आलेले रविंद्र हिरामण राऊत रा स्मारक नगर पेठ ता पेठ जि नाशिक व विनोद मोहनभाई पटेल रा चाणक्य बिल्डींग ओमकार बंगल्याजवळ , सुर्यवंशीरोड पंचवटी - नाशिक हे त्यांचेडील इटीऑस कार क्रमांक एमएच 03 सीएच 3762 हिचे मध्ये आले. पंचासमक्ष छापा टाकुन त्यांचेकडुन 500 दराच्या बनावट 291 नोटा व इटीऑस कार किमंत अंदाजे 4,00,000 रु जप्त करण्यात आली आहे.

वरील इसमांनी भारतीय चलनातील 500दराच्या बनावट 291 नोटा व्यवहारात आण्ण्यासाठी प्रयत्न केला म्हणून पोलीस कोंस्टेबल प्रदिप आजगे यांचे फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस स्टेशनला वरील इसमांविरुध्द भादवि कलम 489 क . ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे .

Web Title: Five arrested for smuggling counterfeit notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.