शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आधी सोशल मीडियावर स्टेट्स ठेवून दिला इशारा अन् नंतर काढ़ला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 21:25 IST

Murder Case : पालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये गॅंगवॉर आणखी भडकण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभांडूपमधील टोळी युद्धातून सूरज मेहरा उर्फ सूरज नेपाळी याची रविवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास रावते कंपाऊंड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सूरज नेपाळी हा पोलीस अभिलेखावरील आरोपी आदित्य क्षीरसागर उर्फ शिऱ्याचा खास पन्टर होता.

मनीषा म्हात्रेमुंबई : 'निकला भाऊ से टक्कर लेने.. ताऊ मामुली आदमी नही है.. उद्या रात्री दोन वाजता.. समझदारला इशारा काफी.. सीधा चीर... ..भाईला पण ऐकू द्या गुड न्यूज आत (जेल)'  हे दोन स्टेटस भांडुप हत्याकांडातील आरोपींनी हत्याकांडाच्या आधी आपल्या सोशल मीडियावरील खात्यावर अपलोड केले. त्यानंतर या आरोपींनी ठरल्याप्रमाणे हत्याकांड घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भांडुप पोलिसांकड़ून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.        

भांडूपमधील टोळी युद्धातून सूरज मेहरा उर्फ सूरज नेपाळी याची रविवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास रावते कंपाऊंड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक करुन आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. अटक आरोपींकडे आणि अभिलेखावरील काही आरोपींना ताब्यात घेऊन भांडुप पोलीस पसार आरोपी राहुल जाधव, उमेश कदम यांचा शोध घेत आहेत.     

पोलिसांकडून आरोपींना अटक झाली तरी, येत्या काळात भांडुपमध्ये गॅंगवॉर आणखी भडकण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सूरजने कारागृहातून बाहेर पडताच आपले चायनीज सेंटर सुरु केले होते. तारखेला न्यायालयात गेला असताना भांडुपमधील एका भाईसोबत त्याचा वाद झाला होता. यावेळी सूरजने त्याला थेट एकट्याने समोरासमोर भीडण्याची धमकी दिल्याचे समजते.     

सूरज नेपाळी हा पोलीस अभिलेखावरील आरोपी आदित्य क्षीरसागर उर्फ शिऱ्याचा खास पन्टर होता. शिऱ्या हा एका भाईसोबत हत्याकांडात सहभागी होता. त्यानंतर तो भाईपासून वेगळा झाला. पुढे शिऱ्या आणि सागर जाधव उर्फ सागऱ्या यांनी स्वतंत्र टोळी तयार करुन खासदाराचा राजाश्रय घेतला. पुढे शिऱ्या हा सागऱ्यापासून वेगळा झाला असून भांडुप टेम्भीपाडा येथील एका झोपडपट्टी दादासोबत वावरत असल्याची माहिती मिळते आहे.         

सूरज नेपाळी याची हत्या सुभाष भांडे टोळीने केली. एका बड्या भाईच्या इशाऱ्यावरुन ही हत्या घडवून आणल्याची जोरदार चर्चा सध्या भांडुपमध्ये रंगली आहे. यातूनच गुन्हेगारी टोळ्या याचा फायदा उठवण्याची आणि बदला घेऊन आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे पालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये गॅंगवॉर आणखी भडकण्याची शक्यता आहे. पोलीस म्हणे नेमके कारण अस्पष्ट..भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पाहिजे आरोपीसोबत असलेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समजते. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पाहिजे आरोपीचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसDeathमृत्यू