शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

पहिलीच पोस्टिंग; यवतमाळहून बीडला आला अन् लाच घेताना जाळ्यात अडकला; एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 22:04 IST

प्रामाणिक काम करण्याऐवजी लाच घेतल्याने या लिपिकावर गुन्हा दाखल झाला.

बीड : सहा वर्षांपूर्वी लिपिक सह जिल्हा निबंधक कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी लागली. नव्या जोमाने काम करण्याऐवजी लाच घेण्याची सवय झाली. यातच एका व्यक्तीने बीडच्या एसीबीकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर अवघ्या तीन तासांतच एसीबीने सापळा रचून या लिपिकाला दीड हजार रुपयांची लाच घेताना बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास केली. नोकरीसाठी यवतमाळहून बीडला आला. पहिलीच पोस्टिंग होती. प्रामाणिक काम करण्याऐवजी लाच घेतल्याने या लिपिकावर गुन्हा दाखल झाला.

विनोद गिरीधर मुनेश्वर (वय ३२, रा. जराठी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ ह.मु. बीड) असे पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे आईचे नावावरील जमीन नावावर करण्याबाबत गेवराई न्यायालयाने आदेश दिलेले आहे. त्याकरिता सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी मुनेश्वरने १५०० रुपयांची लाच मागितली. नियमाप्रमोण केवळ ६०० रुपये लागत असतानाही जास्तीचे पैसे मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. येथे पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी सर्व माहिती घेत लगेच ५ वाजता सापळा लावला. मुनेश्वर याने आपल्या टेबलवर बसूनच ही लाच स्वीकारली. धस यांच्यासह टीमने त्याला पकडले. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अमोल धस, भरत गारदे, हनुमान गोरे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

कारवाईआधी घेतले सहा हजार रुपये -१५०० रुपयांची लाच घेण्याअगोदर याच मुनेश्वरने एका व्यक्तीकडे सहा हजार रुपयांची लाच घेतली होती, अशी चर्चा कार्यालयात होती. या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्राप्त झाल्या होत्या. परंतु पुरावा मिळत नव्हता. तसेच चौकशीही गुलदस्त्यात राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु मुनेश्वरवरील कारवाईने या कार्यालयात लाच घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणBeedबीड