शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी भिंतीवर मजकूर लिहिला, नंतर गळफास घेतला, ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून मनपा सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 23:37 IST

Crime News: ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) या मनपा सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री रामेश्वर काॅलनीतील मंगलपुरीत उघडकीस आली.

जळगाव : ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून भीमराव रमेश तिलोरे (वय ३५) या मनपा सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री रामेश्वर काॅलनीतील मंगलपुरीत उघडकीस आली. भीमराव याने आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवर लल्ला सरपटे याच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा मजकूर लिहिला आहे. त्याशिवाय मदतीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिस कर्मचाऱ्यांचा नंबर दिलेला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमराव हा महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता सोमवारी सायंकाळी तो कामावरून घरी परतला.

वरच्या मजल्यावर जाऊन झोपला वडील रमेश तिलोरे चहासाठी  बोलवण्यास गेले असता त्याने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.हा प्रकार लक्षात आल्यानंतर वडील व इतर नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार रामकृष्ण पाटील व संदीप धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. भीमराव याचा घटस्फोट झालेला होता. माझ्या आत्महत्येला लल्ला जबाबदार आहे घरच्यांना जबाबदार धरू नये असे भिंतीवर लिहून ठेवलेले आहे. त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव