शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 20:52 IST

चारित्र्यावर संशय घेत नवविवाहितेला पतीने दिला तलाक

ठळक मुद्देमुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम ४ व उपरोक्त सात जणाांविरुध्द सहकलम ४९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी शहरातील लक्कडगंज माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेने शहर पोस्टेला तक्रार दिली

खामगाव - तीन महिन्या अगोदर लग्न झालेल्या नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तलाक दिल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी खामगाव माहेर असलेल्या २० वर्षीय नवविवाहितेच्या तक्रारीवरुन पतीसह सासरच्या आठ जणाांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिहेरी तलाकचा हा खामगावातील पहिला गुन्हा आहे.याप्रकरणी शहरातील लक्कडगंज माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेने शहर पोस्टेला तक्रार दिली की, तिचा ३ मार्च २०१९ रोजी शेख अतीक शे. बिसमिल्ला रा.पेठ मोहल्ला नांदुरा याचेशी विवाह झाला. विवाहानंतर त्याने दुचाकी आणि घरात सोफा आदी वस्तू खरेदी करण्यासाठी माहेरवरुन पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक आणि मानसिक छळ केला. तर सासरा शेख बिसमिल्ला, सासू नसीमाबी शो.बिसमिल्ला, जेठ शे. शफिक शे.बिसमिल्ला, जेठाणी हिना परवीन शे.शकील, जेठाणी बबली शे.शफिक, नणंद उस्मानाबी अधिक एक सर्व रा.पेठ मोहल्ला नांदुरा यांनीही सदर विवाहितेला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देवून पैशाची मागणी केली तसेच पती शेख अतीक याने चारित्र्यावर संशय घेत तलाक दिला. या तक्रारीवरुन येथील शहर पोस्टेत पती शेख अतीक शे.बिसमिल्ला याचेविरुध्द मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम ४ व उपरोक्त सात जणाांविरुध्द सहकलम ४९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकPoliceपोलिसkhamgaonखामगावMuslimमुस्लीम