लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरसंदीप जोशी यांच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या गाडीवर लागल्याने दैव बलवत्तर म्हणून जोशी या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.
धाब्यावरून ७ गाड्या नागपूरच्या दिशेने निघाल्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. तर सर्वात मागे जोशी यांची गाडी होती. संदीप जोशी स्वत:ची फॉर्च्युनर गाडी चालवित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछुट गोळीवार केला.
हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. एका सेकंदाचाही फरक पडला असता तर गोळी त्यांच्या डोक्यात किंवा छातीला भेदून गेली असतील. दरम्यान, ते भांबावले पण प्रसंगावधान दाखवत आणि मोठ्या धैर्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. या घटनेसंदर्भात संदर्भात जोशी यांनी लगेच शहर पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना माहिती दिली. तसेच बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आ. विकास ठाकरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त विनीता साहू, पोलीस उपायुक्त निर्मलादेवी, पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जोशी यांचे मित्रमंडळीही घटनास्थळी उपस्थित होते.