शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

चंद्रपूरात खळबळ! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 08:23 IST

राजुऱ्यात गोळीबार - भाजयुमो नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, कोळसा तस्करीतून प्रकार घडल्याचा संशय

राजुरा (चंद्रपूर) राजुरातील सोमनाथपूर वॉर्डमधील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (२७) यांचा मृत्यू झाला असून, शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले. कोळसा तस्करीतून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

रात्री उशिरा आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून, त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. लल्ली शेरगिल हेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रात्री चंद्रपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले काका माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांच्यासह बाहेर गेले होते. पूर्वाशा यांचा नाहक जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हकनाक गेला जीव

लल्ली शेरगिल हे सचिन डोहे यांच्या घराशेजारीच राहत असून, गोळीबार करणाऱ्याने त्यांचा पाठलाग केल्याने जीव वाचविण्यासाठी ते डोहे यांच्या घरात शिरले. पाठलाग करणाऱ्याने गोळीबार केला त्याचवेळी पूर्वाशा घराबाहेर आल्याने त्यांच्या छातीत गोळी लागली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना राजुरा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वाशा डोहे यांना मृत घोषित केले.

टॅग्स :FiringगोळीबारBJPभाजपा