शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकावर कळव्यात गोळीबार; गंभीर जखमी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:37 IST

केवळ हाताला गोळी लागल्याने खान या हल्ल्यातून सुदैवाने बचावले आहेत.

ठळक मुद्देयाप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराविरुद्ध खूनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने ही गोळी त्यांच्या कारच्या ड्रायव्हर बाजूकडील काच फोडून उजव्या हाताच्या दंडामध्ये शिरली.

ठाणे - मुंबईतील हॉटेल व्यावसायिक मेहबूब खान  (42, रा. खार, मुंबई) यांच्यावर खारेगाव टोल नाक्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर कळवा येथे गोळीबार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराविरुद्ध खूनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ हाताला गोळी लागल्याने खान या हल्ल्यातून सुदैवाने बचावले आहेत.खार येथे हॉटेलचा व्यवसाय करणारे खान हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी मुंब्रा येथे आले होते. रात्री पावणो 12 वाजण्याच्या सुमारास ते पत्नी आणि पाच वर्षीय मुलीसह मीरा रोड येथील आपल्या दुसऱ्या घरी ते कारने जात होते. ते खारेगाव टोल नाक्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याने डावीकडील वळणावर असताना मोटारसायकलवरुन त्यांच्या उजव्या बाजूने आलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरने गोळीबार करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न केला. सुदैवाने ही गोळी त्यांच्या कारच्या ड्रायव्हर बाजूकडील काच फोडून उजव्या हाताच्या दंडामध्ये शिरली. गंभीर जखमी झालेल्या खान यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांना शोधण्यासाठी दोन पथकांचीही निर्मिती करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस. व्ही. आजगावकर यांनी दिली. कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध 13 ऑक्टोबर रोजी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसbusinessव्यवसायMumbaiमुंबईthaneठाणेkalwaकळवा