शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या कुर्ल्यात गोळ्या घालून गुंडाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:25 IST

मारेकऱ्यांची ओळख पटली असून विनोबा भावे नगर पोलिसांनी बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार याला ताब्यात घेतलं आहे.

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून जानू पवार उर्फ बिल्ला या गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज सकाळी ही घटना घडली असून त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.बिल्लाने विनोदचा भाऊ दिपक पवार याची काही वर्षांपूर्वी हत्या केली होती.

मुंबई - कुर्लामधील हलवा पूल येथे पूर्ववैमनस्यातून जानू पवार उर्फ बिल्ला या गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज सकाळी दिवसाढवळ्या ही घटना घडली असून त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मारेकऱ्यांची ओळख पटली असून विनोबा भावे नगर पोलिसांनी बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार याला ताब्यात घेतलं आहे.

कुर्ल्यातील विनोबा भावे परिसरात बिल्लाची मोठी दहशत होती. नागरिकांना धमकावणं आणि त्यांना मारहाण करणं या सारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यात बिल्लावर आहे. तेथील एका दुसऱ्या टोळीसोबत त्याचा वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वीच बिल्ला जामीनावर बाहेर आला होता. आज सकाळी बिल्ला हलवा पूल येथून जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिल्लाला जमावाने तातडीने रिक्षातून सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत माहिती मिळताच विनोबा भावे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. बिल्लाने विनोदचा भाऊ दिपक पवार याची काही वर्षांपूर्वी हत्या केली होती. त्याच वादातून बिल्लाची हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसFiringगोळीबार