शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:11 IST

दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला

ठळक मुद्देहवेत फायर झाल्याने प्राण वाचले, लाथा बुक्क्यांनी मारहाण आरोपीला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी, गाडीच्या अपघाताची नुकसान भरपाई मिळू दिली नाही म्हणून केला हल्ला 

चाकण : दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत चुलत भाऊ मोठ्याने ओरडल्याने पिस्टलमधील गोळीचा हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी ( दि. २२ ) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ही घटना शुक्रवारी (दि. २१) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेठाण गावात घडली. याबाबत शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय ३३ वर्षे, केटरिंग व्यवसाय, रा.आंबेठाण, राम मंदिरा शेजारी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निलेश उर्फ जगु नवनाथ मांडेकर (वय २६ वर्षे, रा. आंबेठाण, चाकण, ता. खेड ) याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, आरोपी निलेश उर्फ जग्गू नवनाथ मांडेकर हा दिनांक २१/ १२/ २०१८ रोजी रात्री ८/५० वा. चे सुमारास फिर्यादी चव्हाण यांचा मावसभाऊ शांताराम गाडे यांचा मित्र राजू मोहिते यांच्या फोर्ड गाडी (एमएच १४ - एफएम - ९१५९ ) व आरोपी मांडेकर यांची ईरटीगा गाडी (एमएच-१४. ६०३४ ) या दोन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात झालेल्या आरोपीच्या गाडीचे नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून मांडेकर याने गावठी कट्टा हा फिर्यादी चव्हाणच्या डोक्यास लावला. त्यावेळी फिर्यादीचे सोबत असणारे चुलत भाऊ गणेश चव्हाण मोठ्याने ओरडल्याने फिर्यादीने आरोपीच्या हाताला धक्का दिल्याने पिस्टलमधून गोळी हवेत फायर झाली. आरोपीच्या हातातून गावठी कट्टा हिसकावून घेत असताना आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिस्तुलाने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीला अटक करण्यात आली असून खेड न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस नाईक एस.ए. मापारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक पासलकर हे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :ChakanचाकणKhedखेडPoliceपोलिस