शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली पंजा भागात फायरिंग, १० ते १५ वाहनांची तोडफोड : गुंडांचा हैदोस, प्रचंड तणाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 00:36 IST

तहसील, पाचपावली आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागलेल्या मस्कासाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांच्या गटात जोरदार धुसफूस सुरू आहे.

नागपूर : गुंडांच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान रविवारी रात्री फायरिंग मध्ये झाले. एका गटाने प्रतिस्पर्धी गटातील गुंडांवर हल्ला चढवला. हाणामारीनंतर  गोळीबार केला. नंतर १० ते १५ वाहनांची तोडफोडही केली. या घटनेमुळे मध्यरात्रीपर्यंत  मस्कासाथ, बंगाली पंजा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. तहसील तसेच पाचपावलीचा पोलीस ताफा परिसरात पोहचला होता.तहसील, पाचपावली आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागलेल्या मस्कासाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांच्या गटात जोरदार धुसफूस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, दोन गटातील गुंड बंगाली पंजा भागात रविवारी रात्री ११ च्या सुमारास समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. त्यानंतर एका गटातील गुंडाने मोसीन अकोला याच्यावर गोळीबार केला. तर, काही गुंडांनी या भागात उभे असलेली १० ते १५ वाहने फोडली. सुमारे अर्धा तास या भागात गुंडांचा हैदोस सुरू होता. आरडाओरड, शिवीगाळ यामुळे परिसरात प्रचंड तणाव आणि दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच तहसील, पाचपावली आणि लकडगंजची गस्ती पथके त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस तिकडे धावले. तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. वाहनांची तोडफोड झाल्याचे पोलीस मान्य करीत होते.मात्र, गोळीबाराचे आम्हाला पुरावे सापडले नाही, असे पोलीस सांगत होते. मध्यरात्रीपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. कोण जखमी झाले, कुणी हल्ला केला त्याबाबत कसलीही माहिती पोलिसांकडून मिळाली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर