शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

ठाण्यात चोरी लपवण्यासाठी कार्यालायाला लावली आग : बिल्डरच्या चालकाचा प्रताप उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:10 IST

केव्हीला येथील बिल्डरच्या कार्यालयाच्या आगीचे नेमके कारण आता सीसीटीव्हीमुळे स्पष्ट झाले आहे. आठ हजारांची चोरी लपविण्यासाठी चालकानेच हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्हीमुळे झाला धक्कादायक खुलासाचालकाला राबोडी पोलिसांनी केली अटकआठ हजारांच्या चोरीसाठी केले १२ लाखांचे नुकसान

ठाणे : दोन आठवडयांपूर्वी ‘के व्हीला’ येथील भालेराव कन्स्ट्रक्शनच्या ‘समर्थ आर्केड’ या इमारतीच्या पाच आणि सहाव्या मजल्यावर लागलेली आग ही त्याच बिल्डरचा चालक अमोल कुरुंद (२३, रा. शिळगाव, ठाणे) याने लावल्याचे उघड झाले आहे. आठ हजारांची चोरी लपविण्यासाठी त्याने आग लावून १२ लाखांचे नुकसान केले. त्याला याप्रकरणी राबोडी पोलिसांनी अटक केली असून, २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.‘समर्थ आर्केड’ या इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर १२ मार्च रोजी रात्री ११ ते १३ मार्च रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली होती. या आगीत बांधकाम व्यावसायिक संजय भालेराव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आगीचे नेमके कारणही स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, सीसीटीव्हीचा डीव्हीआर भालेराव यांनी तपासल्यानंतर मात्र या आगीमागील धक्कादायक प्रकार समोर आला. यात त्यांचाच चालक अमोल याने त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल एका पाण्याच्या बाटलीत काढून नंतर वॉचमनजवळ ठेवलेली माचिस घेऊन डीव्हीआर बंद केला. त्यानंतर डुप्लीकेट चावीच्या आधारे कार्यालयाचे शटर उघडून लेखा शाखेच्या टेबलामध्ये ठेवलेले आठ हजार रुपये चोरले. हा प्रकार उघड होऊ नये म्हणून टेबलाखाली असलेल्या कागदपत्रांवर बाटलीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात कार्यालयाचे १२ लाखांचे नुकसान झाले. अमोलने केलेले हे सर्वच कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्याचाच डीव्हीआर आता भालेराव यांनी पोलिसांकडे दिल्यानंतर २४ मार्च रोजी याप्रकरणी त्याच्याविरुद्ध चोरीसह, आग लावून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेtheftचोरीCrimeगुन्हा