FIR against woman accountant and her friend | संसार थाटण्यासाठी मालकाच्या लॉकरवर डल्ला, महिला अकाउंटंट आणि मित्रावर गुन्हा दाखल  
संसार थाटण्यासाठी मालकाच्या लॉकरवर डल्ला, महिला अकाउंटंट आणि मित्रावर गुन्हा दाखल  

मुंबई  -  प्रियकराशी लग्न करत संसार थाटण्यासाठी मालकाच्या लॉकरवर लाखोंचा डल्ला मारणाऱ्या महिला अकाउंटंट आणि तिला मदत करणा-या मित्रावर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मित्राला अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

पूजा दरल (२५) असे महिला अकाउंटंटचे नाव आहे. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघे एकमेकांशी लग्न करण्याच्या तयारीत होते. ती वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या चिंतन जेम्स नामक हिºयाच्या कंपनीत नोकरीला होती. काही दिवसांपूर्वी तिने नोकरी सोडली. त्यानंतर, तिच्या जागी रुजू झालेल्या कर्मचाºयाला हिशोबात गडबड असल्याचे लक्षात आले. काही रक्कमही गायब असल्याचे समजले. त्याने याबाबत वरिष्ठांना सांगितले आणि कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. तेव्हा दरल ही कार्यालयात शिरून लॉकरमधील पैसे काढत असल्याचे त्यांनी पाहिले. या प्रकरणी त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करत, दरलचा मित्र अभिषेक खेमकर (२८) याला मानखुर्द परिसरात अटक केली. दरलने चिंतन जेम्स कार्यालयातून चोरलेले पैसे खेमकरकडे दिले होते.


Web Title: FIR against woman accountant and her friend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.