शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लोकलच्या गर्दीतून १७ वर्षीय मुलीचं 'फिल्मी' स्टाईल अपहरण; २५० किमी दूर सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 11:13 IST

पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुलीचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांनी जेव्हा संशयित मुलाचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा त्याचे लोकेशन २५० किमी दूर साताऱ्यात असल्याचे कळाले

ठाणे – मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये रोज लाखोंच्या संख्येने लोकं प्रवास करतात.  अपवाद वगळता लोकल ट्रेनमधील गर्दी क्वचितच कमी दिसते. त्यात ठाण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकलच्या गर्दीतून एका १७ वर्षीय मुलीचं फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकाराचा तपास केला असता अपहरण करणारा अन्य कुणी नसून मुलीचा बॉयफ्रेंड असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबरला ही अल्पवयीन मुलगी बदलापूर ते विक्रोळी असा लोकल प्रवास करत होती. परंतु जेव्हा ती घरी पोहचली नाही तेव्हा कुटुंबाला चिंता लागली. मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होत नव्हता. मुलीचा फोन बंद होता. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत आई वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. मुलगी ट्रेनने एकटी प्रवास करत होती. परंतु ती घरी पोहचली नाही आणि तिच्याशी संपर्क होत नाही असं आई वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्यासोबत १९ वर्षीय मुलावर मुलीला किडनॅप केले असावे असा आरोप केला.

पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुलीचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांनी जेव्हा संशयित मुलाचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा त्याचे लोकेशन २५० किमी दूर साताऱ्यात असल्याचे कळाले. पोलिसांचे पथक साताऱ्याला पोहचले. तेव्हा एका घरातून मुलगा बाहेर पडताना त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या घरात पोलिसांनी पाहिले असता तिथे बेपत्ता मुलगी सापडली. पोलिसांनी या मुलाला अटक करून मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले.

या मुलीने सांगितले की, मुलाने मला फसवून त्याच्यासोबत इथं आणले. तर मुलाने मुलगी स्वत: हून माझ्यासोबत आली असा दावा केला. पोलिसांनी या दोघांच्या मित्रांची चौकशी केली तर मुलगा-मुलगी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे कळाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी कल्याण जीआरपी इथं अपहरणाची तक्रार नोंदवली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी