अर्णब गाेस्वामींसह अन्य दाेघांवर 1914 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 04:40 AM2020-12-06T04:40:34+5:302020-12-06T04:41:16+5:30

Crime News : नितेश सारडा आणि फिराेज शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आधीच दाखल केलेला जामीन अर्ज शनिवारी मागे घेतला, याच न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निकालासाठी १९ डिसेंबर ही तारीख दिली आहे

Filed a 1914 page affidavit on other charges including Arnab Gaeswami | अर्णब गाेस्वामींसह अन्य दाेघांवर 1914 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल

अर्णब गाेस्वामींसह अन्य दाेघांवर 1914 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल

Next

 रायगड : रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्या विराेधात सुमारे १,९१४ पानांचे दाेषाराेपपत्र रायगड पाेलिसांनी शुक्रवारी दाखल केले हाेते. त्यावर १६ डिसेंबर राेजी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. 

नितेश सारडा आणि फिराेज शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आधीच दाखल केलेला जामीन अर्ज शनिवारी मागे घेतला, याच न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निकालासाठी १९ डिसेंबर ही तारीख दिली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी दिली.प्रसिद्ध वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा ठपका गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रायगड पाेलिसांनी सुमारे १,९१४ पानांचे दाेषाराेपपत्र अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शुक्रवारी दाखल केले हाेते. अन्वय नाईक यांनी गाेस्वामी, सारडा आणि शेख या आराेपींचे वास्तुसजावटीचे काम केले हाेते आणि केलेल्या कामाची रक्कम आराेपींनी नाईक यांना दिली नाही. 

नाईक यांना आत्महत्या करण्यास आराेपींनीच प्रवृत्त केल्याचे दाेषाराेपपत्रात पाेलिसांनी नमूद केले आहे, असेही ॲड. साळवी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्या विराेधातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निर्णय जिल्हा सत्र न्यायालय आज देण्याची शक्यता हाेती. मात्र, न्यायालयाने आता १९ डिसेंबरची तारीख दिली आहे.

उपठेकेदाराला दिले होते वास्तुसजावटीचे काम
n रायगड पाेलिसांनी न्यायालयात १९१४ पानांचे आराेपपत्र दाखल केले आहे. अन्वय नाईक यांनी वास्तुसजावटीचे काम उप ठेकेदाराला दिले हाेते. त्यामुळे जाेपर्यंत अर्णब यांच्याकडून पैशाची वसुली हाेत नाही ताेपर्यंत नाईक उपठेकेदाराला पैसे देऊ शकत नव्हते.  
n अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक यांच्यातील संभाषण झाल्याचा पुरावा पाेलिसांकडे आहे. त्याचप्रमाणे बॅंक खात्यांच्या विवरणावरुनही काही गाेष्टी स्पष्ट हाेत असल्याचे पाेलिसांनी दाेषाराेपपत्रात नमुद केले आहे. 
 

Web Title: Filed a 1914 page affidavit on other charges including Arnab Gaeswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.