शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Yo Yo Honey Singhसोबत शोदरम्यान दिल्ली क्लबमध्ये हाणामारी, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:44 IST

Yo Yo Honey Singh manhandled at South Delhi club : या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आता एफआयआर नोंदवला आहे.

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील एका क्लबमध्ये शो करण्यासाठी आलेला गायक यो यो हनी सिंगसोबत गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 27 मार्च रोजी दक्षिण दिल्लीतील एका क्लबमध्ये गायक यो यो हनी सिंगवर कथित हल्ला करण्यात आल्यानंतर चार ते पाच अज्ञात लोकांच्या गटाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आता एफआयआर नोंदवला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यो यो हनी सिंग आणि त्याचे वकील इशान मुखर्जी यांनी २८ मार्च रोजी 'उपद्रव, गैरवर्तन आणि धमकावल्याची तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 27 मार्च रोजी स्कॉल क्लब, साउथ एक्स्टेंशन-2 येथे घडली. एफआयआरनुसार, यो यो हनी सिंग 26 आणि 27 मार्चच्या मध्यरात्री क्लबमध्ये परफॉर्म करण्यासाठी आला होता. त्यानंतर 27 मार्चच्या रात्री शो सुरू असताना चार-पाच जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्टेजवर चढून कलाकारांशी झटापट सुरू केली.एफआयआरमध्ये म्हटले आहे, “4-5 अज्ञात लोकांनी स्टेजवर गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि कार्यक्रमात व्यत्यय आणला. पूर्ण शोमध्ये त्याने बिअरच्या बाटल्या दाखवल्या आणि कलाकारांना धक्काबुक्की करून स्टेजवरून ढकलले. त्यानंतर चेक शर्ट घातलेल्या एका माणसाने माझा (हनी सिंग) हात पकडला आणि मला पुढे ओढायला सुरुवात केली. मी ते टाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो माणूस मला आव्हान देत होता आणि धमक्या देत होता. त्यांच्याकडे एक शस्त्र असल्याचेही मी पाहिले. लाल शर्ट घातलेला आणखी एक माणूस व्हिडिओ बनवत होता आणि म्हणत होता 'भगा दिया हनी सिंग को.'हनी सिंगसह सर्व कलाकारांनी स्टेज रिकामा केला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हनी सिंगला मध्येच कार्यक्रम सोडावा लागला, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हेतुपुरस्सर दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप हनी सिंग किंवा त्याच्या वकिलाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहPoliceपोलिस