शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आधी होणाऱ्या पत्नीवर चाकूने केले सपासप वार, नंतर तिच्याच ओढणीने लावून घेतला गळफास....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:38 IST

Crime News : हमीरपूर जिल्ह्यातील इटोरा गावातील राहणारी १९ वर्षीय ज्योतिचं लग्न जालोन जिल्ह्यातील २२ वर्षीय तरूण देवेंद्रसोबत तीन वर्षांआधी ठरलं होतं.

Crime News : उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) हमीरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका जोडप्याचं वैवाहिक जीवन सुरू होण्यापूर्वीच संपलं. तरूण देवेंद्रने आपली होणारी पत्नी ज्योतिवर आधी चाकूने सपासप वार केले(Murder) आणि त्यानंतर तिच्याच ओढणीने स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

हमीरपूर जिल्ह्यातील इटोरा गावातील राहणारी १९ वर्षीय ज्योतिचं लग्न जालोन जिल्ह्यातील २२ वर्षीय तरूण देवेंद्रसोबत तीन वर्षांआधी ठरलं होतं. ज्योतिचे आई-वडील विटांच्या भट्टीवर काम करतात आणि ज्योति तिच्या आजोबांकडे इटोरा गावात राहते. (हे पण वाचा : डंबेल्सने पत्नीच्या डोक्यात केले वार; खुनानंतर दोन चिमुकल्यांना घरात कोंडून पती फरार)

देवेंद्र बुधवारी सायंकाळी साधारण ४ वाजता होणारी पत्नी ज्योतिला भेटण्यासाठी इटोरा गावात आला होता. यावेळी ज्योति तिची मैत्रीण सरोजसोबत शेतावर गेली होती. देवेंद्र शेतावर गेला तर तिथे त्याच्यात आणि ज्योतिमध्ये काही कारणाने वाद झाला. यानंतर देवेंद्रने अचानक ज्योतिवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिच्या ओढणीने स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केली. (हे पण वाचा : धक्कादायक! आधी गर्भवती पत्नीसोबत काढला सेल्फी नंतर १ हजार फूट उंचीवरून दिला धक्का, वाचा कारण....)

घटनेवळी ज्योतिची मैत्रिण सरोजही तिथेच होती. जेव्हा सरोजने देवेंद्र अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्यावरही चाकूने वार केले. ज्यात ती जखमी झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ज्योतिला उपाचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिला झांसीला शिफ्ट करण्यात आलं आहे. पण इथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ज्योतिचे काका मोहन यांनी सांगितले की, रोज प्रमाणे ज्योति जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. 

हमीरपूर एसपी नरेंद्र कुमार सिंह म्हणाले की, तरूणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीवर जीवे मारण्यासाठी चाकूने सपासप वार केले आणि स्वत:ही फाशी लावून घेतली. पण दोघांच्या वादाचं कारण मात्र समजू शकलं नाही. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीMurderखूनSuicideआत्महत्या