शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:58 IST

female journalist attacked by two bikers: मध्यरात्री एका महिला पत्रकारावर दोन स्कूटरस्वारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

female journalist attacked by two bikers: नोएडामध्ये मध्यरात्री एका महिला पत्रकारावर दोन स्कूटरस्वारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रात्री सुमारे १२ वाजून ४५ मिनिटांनी घडली. ही महिला पत्रकार नोएडातील आपल्या ऑफिसमधून दिल्लीतील वसंत कुंज येथे घरी जात होती. दोन पुरुषांनी तिच्या कारचा बराच वेळ पाठलाग केला आणि तिने कार न थांबवल्यामुळे त्यांनी तिच्या वाहनाची काच फोडली. त्यानंतर बऱ्याच घटना घडल्या आणि अखेर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पत्रकार एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीत कार्यरत आहे. ती नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवरून फोर्ड फिगो कारने प्रवास करत असताना, दोन स्कूटरस्वारांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यांनी वारंवार तिची कार थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु पत्रकाराने थांबण्यास नकार दिला. अखेर त्या दोघांपैकी एकाने लाकडी वस्तूने तिच्या कारची मागील काच फोडली.

संकटाच्या क्षणी, तिने धाडस दाखवत आरोपींचे चित्रीकरण केले आणि कार वेगाने पुढे नेली. डीएनडी फ्लायओव्हरपर्यंत त्यांनी तिचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर तिने आश्रम परिसरात पोहोचल्यावर पोलिसांना फोन करून मदत मागितली. लाजपत नगर येथे काही टॅक्सी चालकांनी तिची स्थिती ओळखून तिला मदत केली, मात्र तेव्हा आरोपी पळून गेले.

पत्रकाराने तत्काळ सनलाईट कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman journalist attacked in Delhi; Car chased, smashed, two arrested.

Web Summary : A woman journalist was attacked in Delhi by two bikers who chased and smashed her car. She bravely filmed them. Police arrested the culprits after she sought help. The incident raises concerns about women's safety.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीJournalistपत्रकारPoliceपोलिस