उत्तर प्रदेशच्या हापूरमधील एका नवविवाहित वधूला मोठा धक्का बसला आहे. कारण लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच तिच्या नवऱ्याने तिला सोडून गर्लफ्रेंडशी मंदिरात लग्न केलं आणि पळून गेला. त्याची गर्लफ्रेंड ही हापूर पोलिसात तैनात असलेली एक महिला कॉन्स्टेबल आहे. आता पहिली पत्नी दारोदार भटकत आहे आणि तिने पोलीस अधीक्षकांकडे न्याय मागितला आहे. या घटनेनंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करण्यात आलं आहे आणि एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
हापूरच्या बाबूगड पोलीस स्टेशन परिसरातील रसूलपूर गावात ही घटना घडली आहे. नेहाचं लग्न १६ फेब्रुवारी रोजी गजलपूर येथील रहिवासी नवीनशी झालं होतं. नवीन वीज विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. लग्नानंतर, नेहाने अनेक स्वप्न पहिली होती. पण तिला हे माहित नव्हतं की तिचा नवरा आधीच दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहे. लग्नाच्या काही दिवसांतच नेहाला जाणवू लागलं की नवीन तिच्यापासून अंतर ठेवत आहे आणि तिला स्वीकारण्यात रस दाखवत नाही.
घटस्फोट न देता निर्मलाशी मंदिरात गुपचूप केलं लग्न
काही दिवसांनंतर नेहाला समजलं की, नवीनचे हापूरमधील वन स्टॉप सेंटरमध्ये तैनात असलेल्या महिला हेड कॉन्स्टेबल निर्मलाशी प्रेमसंबंध आहेत. नेहाचा आरोप आहे की लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांनी नवीनने निर्मलाला घटस्फोट न देता निर्मलाशी मंदिरात गुपचूप लग्न केलं आणि नंतर दोघेही पळून गेले. जेव्हा नेहाने याचा विरोध केला तेव्हा नवीनने तिचा खूप अपमान केला.
नवीन आणि निर्मलाला पकडलं रंगेहाथ
१६ एप्रिल रोजी नेहा साकेत कॉलनीत गेली आणि नवीन आणि निर्मलाला रंगेहाथ पकडलं. पण यानंतर दोघंही घर सोडून पळून गेले. नेहाने ताबडतोब हापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये तिने संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. नेहाच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत पोलीस अधीक्षक ज्ञानंजय सिंह यांनी महिला पोलीस अधिकारी निर्मलाला सस्पेंड केलं आहे आणि नवीन आणि निर्मला दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे आणि लवकरच आरोपींना पकडलं जाईल असंही म्हटलं.