शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या पत्नीचा कुरिअर बॉयवर जीव जडला; लिव्ह-इनचा निर्णय घडला अन् भलताच प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 08:22 IST

Crime News : एका डॉक्टरच्या पत्नीचा कुरिअर बॉयवर जीव जडला. त्यानंतर दोघांनी दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाचा विषय निघताच भलताच प्रकार घडला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका डॉक्टरच्या पत्नीचा कुरिअर बॉयवर जीव जडला. त्यानंतर दोघांनी दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाचा विषय निघताच भलताच प्रकार घडला आहे. टीटी नगर पोलिसांनी जबलपुरमध्ये राहणाऱ्या कुरिअर बॉयने डॉक्टरच्या पत्नीवर बलात्कार केल्याची माहिती दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, एक पार्सल पोहोचवण्यादरम्यान कुरिअर बॉयसोबत तिची चांगली मैत्री झाली. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन वर्षांपर्यंत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये ठेवलं. नंतर मात्र लग्नाचा विषय येताच नकार दिला. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. एसआय आकांक्षा शर्मा यांनी सांगितलं की, या भागात राहणारी 36 वर्षी महिला खासगी ठिकाणी काम करते. तिच्या डॉक्टर पतीचा 2016 मध्ये मृत्यू झाला आहे. तिला 13 वर्षांची मुलगीही आहे. 

महिलेने पोलिसांना सांगितलं की, ब्लू डॉट कंपनीकडून ती कुरिअर मागवीत होती. याच दरम्यान जबलपूरमध्ये कुरिअर कंपनीत नोकरी करणारा दीपक सिंह ठाकूर याच्यासोबत तिची मैत्री झाली. मैत्री वाढल्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. दीपक तिला भेटायला जबलपूरहून भोपाळला येत होता. 1 जानेवारी 2017 मध्ये दीपकने तिला भेटायला न्यू मार्केट येथील कंचन लॉज येथे बोलावलं. 

दीपकने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिलेला लग्नाचं वचन दिलं. दीपक जबलपूरमधून भोपाळला महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. दोन वर्षांपर्यंत सोबत राहिल्यानंतर जेव्हा महिलेने दीपकवर लग्नासाठी दबाव आणला तर तो मागे हटला. यानंतर महिलेने टीटी नगर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी