शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महिला इन्स्पेक्टरची दादागिरी! ऑन ड्यूटी दाबून घेतले पाय, अशी कारवाई झाली की जन्माची अद्दल घडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:54 IST

Lady Police Incpector Photo Viral : संभलच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या महिला निरीक्षक शबनमचा एक फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

संभल : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये तैनात असलेल्या महिला इन्स्पेक्टरचा असा फोटो व्हायरल होत असून, त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. वास्तविक, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये महिला इन्स्पेक्टर ड्युटीदरम्यान एका व्यक्तीकडून पाय दाबून घेताना दिसत आहे. हा व्हायरल फोटो एसपींच्या निदर्शनास येताच महिला इन्स्पेक्टरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. यासोबतच एसपी चक्रेश मिश्रा यांनी पिंक चौकीच्या प्रभारी पदी या महिला इन्स्पेक्टरची 2 दिवसांपूर्वी दिलेल्या नेमणूक आदेशालाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे या महिला पोलीस अधिकाऱ्याला या कारवाईमुळे जन्माची अद्दल घडली आहे. संभलच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या महिला निरीक्षक शबनमचा एक फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटोमध्ये इन्स्पेक्टर शबनम पोलीस ठाण्यात आपल्या खुर्चीवर आराम करत फोनवर बोलत असल्याचे दिसले. तसेच समोर खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती तिचे पाय दाबताना दिसत आहे. हा फोटो गेल्या बुधवारचा आहे. दरम्यान अनेक तक्रारदारांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले, मात्र महिला निरीक्षकाने कोणाचीही तक्रार ऐकून घेतली नाही, असेही सांगण्यात येत आहे.महिला निरीक्षकाने खुलासा केला

व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणी महिला  पोलिसाने  स्पष्टीकरण देताना आपल्या मानेत दुखत असल्याने समोर बसलेल्या व्यक्तीकडून ॲक्युप्रेशर पद्धतीने उपचार करून घेत असल्याचे म्हटले आहे.पिंक चौकीला प्रभारी बनवायचे होते, या आदेशाला स्थगिती देण्यात आली

महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्याचे एसपी चक्रेश मिश्रा यांनी महिला निरीक्षक शबनम यांना धारेवर धरले आहे. एसपी चक्रेश मिश्रा यांनी दोन दिवसांपूर्वी शबनमला पिंक चौकीची प्रभारी बनवण्याचे आदेश दिले होते, मात्र आता त्या आदेशाला रोख लावण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशViral Photosव्हायरल फोटोज्