FDAने गोव्यात भेसळयुक्त विक्रेत्यांकडून वसूल केला तब्बल ३ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 03:56 PM2024-04-07T15:56:43+5:302024-04-07T15:57:16+5:30

कुठेही भेसळीचे प्रकार आढळून आल्यास FDAला संपर्क साधण्याचे आवाहन

FDA recovers Rs 3 lakh fine from adulterated sellers in Goa | FDAने गोव्यात भेसळयुक्त विक्रेत्यांकडून वसूल केला तब्बल ३ लाखांचा दंड

FDAने गोव्यात भेसळयुक्त विक्रेत्यांकडून वसूल केला तब्बल ३ लाखांचा दंड

नारायण गावस, पणजी: बेकायदेशीर आणि भेसळयुक्त अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करुन राज्य अन्न व औषध प्रशासनाने न्यायिक दंडाधिकारी यांच्यासमोर पाच खटले दाखल करण्याबरोबरच उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमाेर ३३ खटले दाखल केले आहेत.  तसेच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून ३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला.

अन्न औषधी प्रशासनाची अवैध्य व्यावसाय धाड सुरुच आहे. खात्याने २०२३ मध्ये अन्नाचे २,८५५ सर्वेक्षण नमुने आणि १,०९२ वैधानिक नमुने गोळा केले आहेत. अन्न औषधी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,  ग्राहकांकडून येणाऱ्या अनेक तक्रारींचे निराकरण केले जाते. कायदा आणि गोवा सार्वजनिक आरोग्य सुधारणा कायदा लागू करण्याबरोबरच जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. अन्न सुरक्षिततेच्या खाण्याचा अधिकार मिशनला देखील प्रोत्साहन देत आहोत तसेच स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया पालन करत नसलेल्या पदार्थांवर कारवाई केली जात आहे.

अन्न औषधी प्रशासनाचे अधिकारी सार्वजनिक तसेच इतर मार्केटमधील दुकानावर धडक देत असून जर मिलावटी साहित्य सापडले तर कारवाई केली जात आहे. तसेच जत्रेत गोबी मन्चुरीयम दुकानांची पाहणी केली जात आहे. तरीही लाेकांना कुठे असे प्रकार आढळून आल्यास एफडीएकडे संपर्क  साधवा असे अन्न औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: FDA recovers Rs 3 lakh fine from adulterated sellers in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.