शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आधी पत्नीसोबत भांडला, नंतर 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून खाली फेकले अन् स्वतः उडी मारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 16:00 IST

वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : पत्नीशी भांडण झाल्यानंतर शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला 3 मजली इमारतीच्या बाल्कनीतून खाली फेकून दिले आणि नंतर स्वतः उडी मारली. ही घटना दिल्लीतील कालकाजी भागातील आहे. वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, मानसिंग आणि त्याची पत्नी पूजा गेल्या काही महिन्यांपासून वादानंतर वेगळे राहत होते. पूजा सध्या तिच्या दोन मुलांसह कालकाजी येथे आजीच्या घरी राहत होती. काल रात्री मानसिंग पत्नी आणि मुलांना भेटायला आला असता दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर रागाच्या भरात मानसिंगने आपल्या मुलाला बाल्कनीत नेले आणि त्याला 21 फूट खाली काँक्रीटवर फेकले आणि नंतर स्वत: उडी मारली, असे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, रुग्णालयात दाखल केलेल्या मानसिंगची प्रकृती सध्या स्थिर आहे, तर मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मानसिंग दारूच्या नशेत असल्याचा आरोप पूजाच्या आजीने केला आहे. तसेच, पोलिसांनी सांगितले की, मानसिंगविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षिकेकडून मुलीवर जीवघेणा हल्ला, शाळेच्या बाल्कनीतून खाली फेकलेदुसरीकडे, या घटनेच्या एक दिवसापूर्वी राणी झाशी रोडवरील मॉडेल बस्ती येथे असलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावरून एका महिला शिक्षिकेने एका विद्यार्थिनीला खाली फेकले होते. तसेच, तिने आधी वर्गाचे दार बंद करून विद्यार्थिनीच्या डोक्यात कात्रीने अनेक वार केले होते. दरम्यान, या जखमी विद्यार्थिनीला शाळेच्या कर्मचाऱ्यांनी बाडा हिंदूराव रुग्णालयात दाखल केले, जिथे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तसेच,देशबंधू गुप्ता रोड पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षिका गीता देसवाल विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. मुलीला फेकल्यानंतर तिने शाळेच्या प्रभारीलाही जखमी केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी