शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बापाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:14 IST

One sided Love Affair : तालुका पोलिसांनी आरोपीस बिहारहून केली अटक

नितिन पंडीत 

भिवंडीएकतर्फी प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या मुलीच्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाणे क्षेत्रातील कवाड येथे घडली असून या मधील हत्या करणाऱ्या आरोपीस भिवंडी तालुका पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे . कमलजीत वारीयम सांडे वय ५५ रा.उल्हासनगर नंबर पाच असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे . तर पप्पू कुमार राजकिशोर साह वय २६ रा.उल्हासनगर मूळ रा.चंपारण्य बिहार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भिवंडी तालुक्यातील वाडा रस्त्यावरील कवाड गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपा शेजारील मोकळ्या निर्जन जागेत ९ मार्च रोजी एक मृतदेह हत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला .त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करीत ओळख पाठविण्याचा प्रयत्न केला असता तो उल्हासनगर येथील कमलजीत वारीयम सांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले .

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एस डी दाभाडे व पोलीस पथकातील पो कर्मचारी काळोखे,वाडविंदे व गुन्हे पथकतील पोलीस यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून व गुप्त बातमीदारांकडून माहिती घेत तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो बिहार येथे पळून गेल्याचे समजताच पोलीस पथकाने थेट बिहार गाठत तेथून आरोपी पप्पू कुमार राजकिशोर साह यास ताब्यात घेत अटक केली . त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्या करण्यसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त करीत त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती तपास अधिकारी दाभाडे यांनी दिली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbhiwandiभिवंडीArrestअटकBiharबिहार