शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा निळ्या रंगाच्या ड्रमची दहशत! पोटच्या मुलानेच बापाला संपवले; आधी छातीत गोळी झाडली, मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 08:07 IST

घटनेच्या दिवशी म्हणजे २० जानेवारीला सकाळी वडील आणि मुलामध्ये शिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी यातून मोठा वाद झाल्याचे समोर आले.

लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील आशियाना परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी बेपत्ता पॅथोलॉजी संचालकाचा मृतदेह त्यांच्याच घरातील एका निळ्या रंगाच्या ड्रमात सापडल्याने परिसरात खळबळ माजली. पोलिस तपासात जे सत्य समोर आले त्याने बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासला. शिक्षण आणि करिअरवरून बाप आणि मुलामध्ये वाद झाला होता आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

या घटनेतील मृत व्यक्ती वर्धमान पॅथोलॉजीचे मालक मानवेंद्र सिंह होते. २० जानेवारीपासून ते बेपत्ता असल्याचं समोर आले. सुरुवातीला त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार कुटुंबाने नोंदवली होती. परंतु मानवेंद्र सिंह यांच्या बेपत्ता होण्यामागे इतके भयावह कारण असेल याची घरच्यांना माहिती नव्हती. सोमवारी मानवेंद्र यांच्या घरातील खोलीत एका ड्रममध्ये मृतदेह सापडला. ज्यानंतर मानवेंद्र सिंह यांची हत्या झाल्याचा अंदाज घेत पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. माहितीनुसार, घटनेच्या दिवशी म्हणजे २० जानेवारीला सकाळी वडील आणि मुलामध्ये शिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी यातून मोठा वाद झाल्याचे समोर आले.

या दोघांच्या वादात संतापलेल्या वडिलांनी त्यांच्या परवानाधारक रायफलमधून मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मुलाने शांत होण्याचा प्रयत्न केल्याने वडिलांनी रायफल बाजूला ठेवून दिली. नेमकी याच संधीचा फायदा घेत मुलाने ही रायफल उचलली आणि वडिलांच्या छातीत गोळी झाडली. या घटनेत मानवेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून घरातील १६ वर्षीय मुलगी जी सध्या अकरावीत शिक्षण घेत आहे. ती खाली आली मात्र मुलाने बहिणीला धमकावले असल्याचे पोलिसांनी सांगितले. बहिणीने या घटनेची कुठे वाच्यता केली तर तुलाही मारून टाकेन अशी धमकी भावाने दिली होती. भीतीमुळे बहिणीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही.

मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये भरले

या घटनेनंतर आरोपी मुलाने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. मृतदेह घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर आणला. तिथे मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली. काही अवयव सदरौना भागात फेकल्याची माहिती आहे. शरीरातील इतर हिस्सा ड्रममध्ये लपवून ठेवला होता. मुलाने नीट परीक्षेची तयारी करावी यासाठी वडील त्याच्यावर दबाव आणायचे. सातत्याने त्याला ओरडायचे त्यातून मुलगा खूप नाराज होता. अनेकदा या गोष्टीवरून घरात वाद झाला होता. या वादाचा परिणाम अखेर वडिलांच्या हत्येत झाला. हत्येनंतर मुलाने करवतीने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते ड्रममध्ये भरले.

मानवेंद्र सिंह जेव्हा ४ दिवस घरी परतले नव्हते तेव्हा घरच्यांना संशय आला त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जेव्हा पोलीस तपास करू लागले तेव्हा वडिलांनी आत्महत्या केली असेल असं मुलाने सांगितले. परंतु मुलाच्या जबाबावर पोलिसांना संशय आला. त्यांनी खाकीचा धाक दाखवत मुलाची उलट तपासणी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र अचानक घडलेल्या वादातून ही हत्या झालीय की यामागे आणखी काही कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Son Kills Father, Hides Body in Blue Drum: Lucknow Horror

Web Summary : In Lucknow, a pathology director was murdered by his son after an argument over education. The son shot his father and hid the body in a drum, later confessing to the crime after police investigation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी