शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत कॉपी केली म्हणून मैत्रिणींसमोर वडिलांनी झापलं; मुलीनं उचललं टोकाचं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 17:14 IST

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एक खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. एका व्यक्तीनं आपल्या मुलीला तिनं परीक्षेत कॉपी केली म्हणून तिच्या वर्ग मैत्रिंणीसमोर झापलं आणि यामुळे पुढे जे घडलं ते सर्वांना धक्का देणारं ठरलं आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एक खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. एका व्यक्तीनं आपल्या मुलीला तिनं परीक्षेत कॉपी केली म्हणून तिच्या वर्ग मैत्रिंणीसमोर झापलं आणि यामुळे पुढे जे घडलं ते सर्वांना धक्का देणारं ठरलं आहे. मैत्रिणींसमोर आपला अपमान झाल्यानं निराश झालेल्या मुलीनं घरी येऊन विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. तिला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. उदयपूरमधील फलासिया परिसरातील बिछीवाडा येथील ही घटना आहे. इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शविविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिछीवाडा येथे सिनीअर स्कूलमध्ये २२ फेब्रुवारी २०२२ रोजी हिंदीचा पेपर होता. यावेळी संबंधित मुलीकडे कॉपी पकडण्यात आली. त्यानंतर तिच्या वडिलांना जे त्याच शाळेच्या ग्रंथालयात कामाला आहेत त्यांनी सर्वांसमोर आपल्या मुलीला झापलं. यामुळे दु:खी झालेल्या मुलीनं घरी आल्यानंतर विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान