शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

धक्कादायक! सुनेवर वार करून सासऱ्यानं घर पेटवलं, मग गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:32 IST

बदलापुरात प्रॉपर्टीच्या वादातून धक्कादायक प्रकार, जखमी सुनेवर रुग्णालयात उपचार सुरू, तर सासऱ्याचा मृत्यू

बदलापूर  : प्रॉपर्टीच्या वादातून सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. या घटनेने बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

बदलापूर पश्चिमेच्या शनि नगर परिसरातील हेरंब सृष्टी अपार्टमेंटमध्ये किसन जाधव हे मुलगा, सून, नात आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. आज दुपारच्या सुमारास जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता, तर मुलाची दोन्ही मुलं बाहेर गेली होती. यावेळी किसन जाधव आणि त्यांची सून असे दोघेच घरात असताना या दोघांमध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाले. या वादात जाधव यांनी सुनेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर सुनेने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि सुनेला रुग्णालयात नेले. मात्र यानाबतर किसन जाधव यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून कपाट लावले आणि संपूर्ण घर पेटवून दिले. यानंतर स्वतः नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या घरातून धूर निघू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाने जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संपूर्ण घर जळून खाक झाले होते, तर जाधव हे अर्धमेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने इमारतीखाली आणले असता इमारतीच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जाधव यांच्या जखमी सुनेवर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हा प्रकार प्रॉपर्टीच्या वादातूनच घडल्याची माहिती जाधव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या घटनेमुळे बदलापूर शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस