शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

हैवान बाप! २ वर्षाच्या चिमुरड्याच्या छातीवर लाथा मारल्या; २४ तास तडफडत ठेवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 12:29 IST

सर्व कुटुंब मुलाच्या अंत्यविधीची तयारी करत असताना कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली की, सोनूच्या सावत्र बापाने त्याला मारलं आहे.

टनकपूर – उत्तराखंड येथील टनकपूर शहरात एका २ वर्षाच्या मुलाला औषधाच्या रिएक्शनने नव्हे तर सावत्र बापाने छातीवर लाथ मारल्याने मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. आरोपीने मुलाच्या हत्येनंतर पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी देत काहीही वाचा न फोडण्याची ताकीद दिली. निष्पाप मुलाच्या आईची विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी हत्येचे गूढ उघड केले.

कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली आणि तुरूंगात पाठविले आहे. रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील नरेश कुमारचा दोन वर्षाचा मुलगा सोनूचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. बेशुद्ध अवस्थेत कुटुंबीयांनी सोनूला सामान्य रूग्णालयात आणले त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निहाल अख्तर यांनी मुलाला मृत घोषित केले.

सर्व कुटुंब मुलाच्या अंत्यविधीची तयारी करत असताना कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली की, सोनूच्या सावत्र बापाने त्याला मारलं आहे. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले, पोलिसांनी आईकडे विचारपूस केली असता तिने तिच्या पतीचा बुरखा फाडत सोनूच्या हत्येचे गुपित उघड केले. यानंतर पोलिसांनी निष्पाप सोनूचा मृतदेह ताब्यात घेतला.

पोलीस प्रमुख जसवीरसिंग चौहान म्हणाले की, तपासात सावत्र पिता नरेश कुमारने मुलाची हत्या केल्याचं उघड झालं. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी नरेश फरार झाला होता, परंतु पोलिसांनी त्याला बनबासा आर्मी छावणीच्या ऑफिसर कॉलनीजवळ अटक केली. याप्रकरणी आरोपीवर आयपीसीच्या कलम ३०२ आणि ५०६ नुसार अटक करून तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

आरोपी बापाने दुसर्‍या कोणत्याही कारणास्तव मुलाची हत्या केली नाही तर फक्त मुलगा रडत असल्याने त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती दिली. आरोपीला रागाने मुलाच्या छातीत लाथ मारल्यानंतर सोनू २४ तास तडफडत होता. त्यावेळी पत्नीने विनवणी केल्यानंतरही निर्दयी बापाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले नाही.

सावत्र बाप शबानाच्या पहिल्या पतीपासून जन्मलेल्या दोन्ही मुलांना तिरस्कार करत होता. शनिवारी आरोपी झोपला होता त्यादरम्यान त्याचा दोन वर्षाचा सावत्र मुलगा सोनू रडू लागला. शबाना सोनूला शांत करायच्या आधीच बाप झोपेतून उठला आणि त्याने सोनूच्या छातीवर लाथा मारल्या. पत्नी शबाना जखमी सोनूला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याची विनवणी करत राहिली, परंतु नरेशला त्या सोनूवर दया आली नाही. सोनू तडफडत होता. २४ तासानंतर सोनूचा मृत्यू झाला. तेव्हा आरोपी बापाने त्याला दवाखान्यात नेले. मुलाला पोटदुखीची औषधं खायला दिले होते असं सांगून डॉक्टर आणि पोलिसांची दिशाभूल केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिस