शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी वडिलांना जामीन मंजूर; आरोप खोटा असल्याची शक्यता : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:15 IST

दोघांमध्ये वैवाहिक वाद असल्याने वडिलांवर खोटा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठाने वडिलांची जामिनावर सुटका केली. 

मुंबई : पालकांच्या वादात मुलीने आईच्या सांगण्यावरून वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप केला असण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तीची जामिनावर सुटका केली. दोघांमध्ये वैवाहिक वाद असल्याने वडिलांवर खोटा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठाने वडिलांची जामिनावर सुटका केली. 

  पीडितेची आई व अर्जदार यांच्यातील गंभीर वादाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या प्रकरणात (मुलीवर लैंगिक अत्याचार) अर्जदाराला नाहक अडकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्जदाराने आधीच एक वर्ष कारावास भोगला आहे. त्याच्यावर आरोप निश्चितीही करण्यात आलेली नाही. ४ डिसेंबर २०२३ रोजी त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची अर्जदाराची याचिका आम्ही मंजूर करत आहे, असेही न्या.पितळे यांनी म्हटले.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचे पालक वेगळे राहतात. ऑक्टोबर २०२३ मध्ये मुलगी वडिलांकडे राहायला गेली.१३ ऑक्टोबर रोजी ती तिच्या बहिणीला शाळेत सोडून घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार  केला. त्याबाबत तिने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी लगेचच आरोपीला अटक केली.

पीडितेने ११ दिवसांनंतर पोलिसांकडे तक्रार केली. तेही आई भेटल्यानंतर तिने गुन्हा  दाखल केला. सुरुवातीला तिने वडिलांनी १३ ऑक्टोबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. तर तिच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिने कोरोनापासून वडील आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने वडिलांचे घर सोडले आणि आईकडे राहायला गेली. 

पुन्हा तेथेच का गेली ?वडिलांनी अत्याचार केला तरी मुलगी पुन्हा वडिलांकडे राहायला का गेली? अशी शंका न्यायालयाने उपस्थित केली.  मुलीमध्ये आणि आईमध्ये मतभेद झाल्यानंतर मुलगी वडिलांकडे राहायला गेली, मुलीवर वडिलांनीच लैंगिक अत्याचार केला असता तर आईने पुन्हा मुलीला वडिलांकडे राहायला का पाठवले असते? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस