“तुझ्या मुलाला दूर कर, नाहीतर बर्बाद होशील”; ज्योतिषाच्या सांगण्यावरून निर्दयी बापाने असं काही केलं...

By प्रविण मरगळे | Published: March 3, 2021 05:17 PM2021-03-03T17:17:21+5:302021-03-03T17:17:46+5:30

रामकी तंत्रमंत्र आणि ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवत होता, जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेकदा तो कोणत्या ना कोणत्या ज्योतिषाकडे जात होता

Father Burn Son alive due to believe in astrology in Tamilnadu | “तुझ्या मुलाला दूर कर, नाहीतर बर्बाद होशील”; ज्योतिषाच्या सांगण्यावरून निर्दयी बापाने असं काही केलं...

“तुझ्या मुलाला दूर कर, नाहीतर बर्बाद होशील”; ज्योतिषाच्या सांगण्यावरून निर्दयी बापाने असं काही केलं...

Next

तिरूवरूर – तामिळनाडूच्या तिरूवरूर येथे एक ह्दयद्रावक घटना घडली आहे, याठिकाणी एका पित्याने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला ज्योतिषाच्या सांगण्यावरून  ठार मारलं आहे, मुलामुळे तुमच्या जीवनात यश मिळत नाही, त्यामुळे प्रगतीच्या मार्गावर अडथळा असणाऱ्या मुलालाच बापाने मारून टाकलं, रामकी नावाच्या रिक्षा चालकाने नशीब पालटवण्यासाठी स्वत:च्या ५ वर्षाच्या मुलावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

रामकी तंत्रमंत्र आणि ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवत होता, जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेकदा तो कोणत्या ना कोणत्या ज्योतिषाकडे जात होता, अशाच एका ज्योतिषाने त्याला सांगितले की, रामकीच्या वाईट काळासाठी त्याला ५ वर्षाचा मुलगा जबाबदार आहे, इतकचं नाही तर या ज्योतिषाने त्याचा मुलगा रामकीच्या जीवासाठी धोकादायकही ठरू शकतो असंही म्हटलं, रामकीला ज्योतिषाने सांगितले पुढील १५ वर्ष त्या मुलाला स्वत:पासून दूर ठेवा. यानंतर रामकीने मुलाला शिक्षणासाठी नातेवाईकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.

परंतु यावरून रामकी आणि त्याच्या पत्नीमध्ये मोठा वाद झाला, सोमवारी रात्री रामकी दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नीसोबत त्याचे भांडण झाले, मुलाला घरापासून दूर ठेवण्याला पत्नीने जोरदार विरोध केला, यात दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यात रामकीने स्वत:च्या ५ वर्षाच्या मुलावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली, मुलाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, परंतु त्याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Web Title: Father Burn Son alive due to believe in astrology in Tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग