शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चौघुले प्लॉट भागात दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला, जळगावातील प्रकार

By विजय.सैतवाल | Updated: July 17, 2023 00:15 IST

रात्री ११ वाजेची घटना, सुटका करीत दुचाकीस्वार पळाला

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: दुचाकीवर जात असलेल्या एका तरुणाला अडवून त्याला बेदम मारहाण करीत डोक्यात फरशा टाकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट भागात घडली. या हल्ल्यातून कसातरी बचाव करीत तरुण धावत सुटला. शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाल्याने हल्लेखोरदेखील फरार झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

मुमराबाद रस्त्यावर चौघुले प्लॉट कॉर्नर नजीक एक दुचाकीस्वार जात असताना त्याला दोन जणांनी अडविले. तो थांबताच त्याच्यावर दहा ते बारा जणांनी हल्ला करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तो परिसरात इकडे तिकडे पळू लागला. त्यावेळी एका ठिकाणी त्याला पकडून त्याच्या डोक्यात फरशा टाकल्या. यातून कशीतरी सुटका करीत हा तरुण पळून गेला. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.

तरुणाच्या दुचाकीची तोडफोड

हा तरुण ज्या दुचाकीवरून जात होता त्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. याशिवाय दुचाकीस्वारावर हल्ला करताना या परिसरात असलेल्या सागर चौधरी यांच्या चारचाकी वाहनाचेदेखील नुकसान झाले. हल्ला करीत असताना समोर सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येतात हल्लेखोराने चेहऱ्यावर रुमाल बांधला व तेथून निघून गेले.

भर वस्तीत दहशत

चौघुले भाग परिसरातील भरवस्तीत हल्लेखोरांनी दहशत पसरविली. आजूबाजूला अनेक जण असतानादेखील हल्लेखोरांनी दुचाकीस्वाराला घेरले व त्याच्यावर हल्ला केला. गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी एका जणाचा खून झाला होता. या परिसरात दहशत दिवसेंदिवस वाढत असून मद्य विक्रीदेखील खुलेआम सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथील गुंडगिरीला आळा बसावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव