शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शेअर भाडे घेणाऱ्या कारचालकाने शेतकऱ्यास फसवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 22:08 IST

गुन्हा काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या लिमडी तालुक्यातील शेतकरी किरण रामु बुटिया (५५) हे मेव्हण्याची मुलगी मंजु व नात दीपिकासह बसने २३ डिसेंबर रोजी वरसावे नाका येथे उतरले.माजिवडा नाका येथे पोहताच कार चालकाने मला मालकाने तात्काळ बोरिवलीला बोलावल्याचे सांगून बुटिया आदींना खाली उतरवले.

मीरारोड - बेकायदेशीरपणे शेअर भाडे घेणाऱ्या खासगी कारचालकांकडूून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गुजरातवरून आलेल्या एका शेतकऱ्याचे ३ लाख ३० हजार रुपये अशाच एका कारचालक आणि त्याच्या साथीदाराने लंपास केल्याचा गुन्हा काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

मीरा रोड रेल्वे स्थानक, भार्इंदरचे सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट), काशिमीरा नाका, वरसावे नाका आदी ठिकाणा वरील बस स्थानक परिसरातुन काही कार चालक बेकायदेशीरपणे प्रवाशी भाडी नेतात. मुंबई, ठाण्या सह वसई भागात हे कार चालक प्रवाशांना सोडतात. शेअर पध्दतीने चालणारी ही वाहतुक बेकायदेशीर असली तरी प्रादेशिख परिवहन व वाहतुक पोलीसांच्या वरदहस्ताने ती राजरोस चालवली जाते. अशा भाडे नेणाराया कार चालकां कडुन प्रवाशांना लूटण्याचे प्रकार घडत आहेत.

गुजरातच्या लिमडी तालुक्यातील शेतकरी किरण रामु बुटिया (५५) हे मेव्हण्याची मुलगी मंजु व नात दीपिकासह बसने २३ डिसेंबर रोजी वरसावे नाका येथे उतरले. त्यांचा मुलगा ऐरोली येथे रहात असून, चाळीत खोली घेण्यासाठी म्हणून ३ लाख ३० हजारांची रोकड मुलाला देण्यासाठी बुटिया यांनी सोबत आणली होती. बस साठी थांबले असता तेथे एका कार चालकाने शेअर पद्धतीने कळवा नाका येथे सोडतो सांगितले. त्यानुसार ते तिघे गाडीत बसले. आधीच एक महिला त्यात बसली होती. नंतर आत जागा नसताना चालकाने त्याचा एक सहकारी मागाच्या सीट मागील मोकळ्या जागेत बसवला. त्या ठिकाणी आधीच चालकाने बुटिया यांची पैसे ठेवलेली बॅग ठेवण्यास सांगितले होते.

माजिवडा नाका येथे पोहताच कार चालकाने मला मालकाने तात्काळ बोरिवलीला बोलावल्याचे सांगून बुटिया आदींना खाली उतरवले. मागे बसलेला कार चालकाचा सहकारी देखील उतरून निघून गेला. कार चालकाने बॅग बुटिया यांच्या हातात देऊन निघून गेला. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता आतील रोख रक्कम चोरीला गेली होती.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाfraudधोकेबाजीPoliceपोलिसFarmerशेतकरीGujaratगुजरात