शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येसाठी प्रेमीयुगलांनी तलावात उडी मारली, शेवटच्या क्षणी प्रियकराने विचार बदलला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:57 IST

कुटुंबीयांनी एके दिवशी दोघांना पकडले व त्यांना मारहाण केली. कुटुंबातील सदस्यांच्या रोजच्या अडवण्यामुळे दोघंही त्रस्त झाले होते.

आझमगड – प्रेम आंधळ असतं ही म्हण मराठीत खूप प्रसिद्ध आहे, प्रेमात एकमेकांवर विश्वास ठेवला जातो, मात्र याला आझमगडमध्ये प्रियकरावर विश्वास ठेवणे प्रेयसीच्या जिवावर बेतलं आहे. जिल्ह्यातील मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता युवतीचा मृतदेह शाळेच्या मागे सापडल्याने खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी आझमगड-बलिया रस्ता रोखून धरला होता.

मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील तलावात युवतीचा मृतदेह सापडला होता, तिने प्रियकरासोबत तलावात उडी घेतली होती. शेवटच्या क्षणी प्रियकराने विचार बदलला आणि तो पोहत बाहेर पडला. त्याने प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर तो पळून गेला आणि कप्तानगंज परिसरातील आपल्या घरी गेला.

दुसर्‍याच दिवशी वडिलांनी आणि चुलतभावांनी त्याच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले, तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मयत युवतीच्या घराशेजारी हा युवक राहत होता. त्याचे आणि युवतीचे प्रेमसंबंध जुळाले याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी दोघांवर बाहेर जाण्यास बंदी घातली. कुटुंबीयांनी एके दिवशी दोघांना पकडले व त्यांना मारहाण केली. कुटुंबातील सदस्यांच्या रोजच्या अडवण्यामुळे दोघंही त्रस्त झाले होते. शनिवारी रात्री दोघेही अचानक गायब झाले. प्रियकराच्या म्हणण्यानुसार, दोघांनीही एकमेकांशिवाय जगू न शकल्याने मरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळेजवळील तलाव गाठले. मरण्यापूर्वी प्रियकराने प्रेयसीच्या कपाळाला सिंदूर लावले. मग त्या दोघांनीही तलावात उडी घेतली. तेवढ्यात प्रियकराचा विचार बदलला अन् त्याने प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ती वाचली नाही. त्यानंतर तो स्वत: पोहच बाहेर आला आणि तेथून पळ काढत घर गाठले.

युवती बेपत्ता झाल्याने तिच्या घरातील नातेवाईक जमा झाले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी मुलीला गायब करण्यामागे प्रियकर असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांना प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार प्रेयसीचा मृतदेह तलावात शोधण्याचा प्रयत्न केला पण तो मिळाला नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी युवतीचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. यानंतर ग्रामस्थ व कुटुंबातील लोक संतप्त झाले आणि त्यांनी मृतदेह चौकात ठेवून रास्ता रोको केला होता. पोलीस आणि प्रशासनाच्या गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर प्रकरण शांत झाले.

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्या