शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, पाच तासांत गुन्ह्यांची केली उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 11:41 IST

कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला...

मुंबई : कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. काही तासांत मुलगा सुखरूप हवा असल्यास पाच लाखांच्या मागणीचा कॉल आला. या घटनेने खळबळ उडाली. बांगूर नगर पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके कामाला लावून तरुणाचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच गुन्ह्याची उकल करत तरुणाची सुटका करण्यास त्यांना यश आले. तपासात, वडिलांकडून पैसे काढण्यासाठी मुलानेच अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दहीसर परिसरात राहणारे तक्रारदार दिनेशलाल नारायण जोशी (४८) यांचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा जितेंद्र जोशी (२७) हा मंगळवारी रात्री गोरेगाव लिंकरोड येथून कामावरून घरी निघाला. मात्र बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही. त्यानंतर, रात्री दोनच्या सुमारास जितेंद्र यांच्या पत्नीच्या मोबाइलवर व्हॉट्स ॲप कॉल आला. मुलाच्या सलामतीसाठी बुधवारी सायंकाळी ७ पर्यंत पाच लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास व पोलिस व इतर कोणाला कळविल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

जोशी कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. वेगवेगळी तपास पथके तयार करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुलाच्या मोबाइल लोकेशन तसेच त्याचा येण्याच्या जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० सीसीटीव्ही तपासले. अवघ्या काही तासांत त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तपासात त्यानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली आहे. 

असा रचला कट जितेंद्रकडे केलेल्या चौकशीत, त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कामगाराला जितेंद्र जोशी यानेच ४ ते ५ दिवसांपूर्वी तो एका अडचणीत असल्याचे सांगितले. त्यातून सुटण्यासाठी त्याचे स्वतःचे अपहरण करून वडिलांकडून पैसे वसूल करण्याबाबत कट आखला.यामध्ये मदत न केल्यास त्याची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याने त्याने त्याला मदत करण्याचे ठरवले.ठरल्याप्रमाणे दि. ३१ मे रोजी जितेंद्र कामावरून सुटल्यानंतर त्याने मित्राकडून पत्नीला फोन लावून वडिलांकडून पाच लाख रुपये आणून देण्यास सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी