नवी दिल्ली : रेल्वे तिकीट भारतीय रेल्वे केटरिंग ॲण्ड टूरिझम काॅर्पोरेशनसाठी (आयआरसीटीसी) रेल्वे तिकिटांची तात्काळ खरेदी, विक्रीसाठी पर्यायी ॲप तयार करून २० लाख रुपयांची कमाई करणाऱ्या आयआयटी पदवीधारकाला रेल्वे सुरक्षा पोलिसांनी अटक केली आहे.एस. युवराज असे आरोपीचे नाव असून, तो खडगपूर आयआयटीचा पदवीधर आहे. या ॲपच्या माध्यमातून आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग प्रणालीला बगल देत प्रवाशांसाठी तिकिटे खरेदी करायचा. त्या मोबदल्यात तो मोठी रक्कम वसूल करायचा.
रेल्वे तिकीट बुकिंगचे बनावट ॲप; लुटले २० लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:43 IST