शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 06:52 IST

कुर्ला पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. फ्रान्सचे नागरिकत्व असलेल्या महिलेच्या व्हिसासाठी बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी फराज मलिक आणि त्यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केलेल्या लॉरा हॅमलीनसह इतर जणांविरोधात कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये हॅमलीनचा टुरिस्ट व्हिसाची मुदत संपल्याने तिने व्हिसासाठी विशेष शाखा २ मध्ये अर्ज केला. यावेळी फराज मलिक सोबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच फराज मलिक यांचे हमीपत्रासह कागदपत्रे जमा केली. मात्र, कागदपत्रांबाबत विशेष शाखेला संशय आल्याने त्यांच्याकडून याबाबत तपास सुरू होता. अखेर, गेल्या आठवड्यात हे प्रकरण कुर्ला पोलिसांकडे तपासासाठी आले. कुर्ला पोलिसांनी केलेल्या चौकशीत, व्हिसासाठी दिलेल्या विवाह प्रमाणपत्राची नोंदणी केली नसतानाही बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी हॅमलीन, फराज विरोधात बनावट कागदपत्रे तयार केल्याचा ठपका ठेवत फसवणूक, बनावट कागदपत्रे, फॉरेन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फराज मलिक याचे बुशराहसोबत पहिले लग्न झाले असून तिला दोन मुली आहे. ती फराज सोबत राहत नसून दुसरीकडे राहण्यास आहे.

कोविड, गर्भवती राहिल्याने व्हिसामध्ये केली होती वाढ

  • २७ एप्रिल २०१५ मध्ये फराजने लॉरासोबत दुसरा विवाह केला. त्यानंतर, अनेकदा कोविड तसेच गर्भवती राहिल्याने टुरिस्ट व्हिसामध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र, पुढे तिने भारतीय व्यक्तीसोबत विवाह केला म्हणून “एक्स वन” व्हिसासाठी अर्ज केला. 
  • याअंतर्गत परदेशी व्यक्तीला भारतीय व्यक्तीशी लग्न केल्याबाबत नमूद होते. आणि ती भारतात राहू शकते. मात्र, त्यांच्या विवाह प्रमाणपत्राबाबत संशय येताच विशेष शाखेने याबाबत पालिकेच्या एल विभागाकडे चौकशी केली.
  • तेव्हा, फराजने ऑनलाईन अर्ज केले असून नोंदणीसाठी आला नसल्याचे सांगितले. त्यानुसार, हे प्रकरण समोर आले.

 

तपास सुरू

व्हिसासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यांचे लग्न झाले होते की नाही? हे कागदपत्रे कुठून व कसे बनवून घेतले? यामध्ये आणखीन किती जणांचा सहभाग आहे? याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्यानुसार, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - मनोज पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस