शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

घरातच सुरू होता बनावट दागिन्यांचा कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 4:58 AM

चांदीवर सोन्याचा मुलामा देत हॉलमार्कचा वापर : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांना दोन कोटींचा गंडा

मुंबई : चांदीवर सोन्याचा मुलामा देत त्यावर हॉलमार्कचा वापर करत घरातच बनावट सोन्याचे दागिने बनवायचे. ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसह पतसंस्थांमध्ये गहाण ठेवून कर्ज घ्यायचे. अशाच प्रकारे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील २० हून अधिक बँकांकडून दोन कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज घेणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला.

यात, मूळचे राजस्थानचे रहिवासी रमेश रामअवतार सोनी, दिनेश रामअवतार सोनी, बिमल रामअवतार सोनी या भावंडांसह अनिलकुमार गुलाबचंद्र स्वामी, प्रशांत संदरेशन नारायण, नीतू सतीशन विलयील या सहा जणांना अटक केली. दिनेश हा मास्टरमाइंड आहे. यापूर्वी तिघेही भाऊ राजस्थानमध्ये सोने कारागीर होते. दिनेशच्या भावाच्या नावे भार्इंदरमध्ये फ्लॅट आहे. येथूनच ते हे काम करत. ते चांदी, अन्य धातूच्या वस्तूंना सोन्याचा मुलामा देत. त्यावर हॉलमार्कचा वापर करायचे. सुरुवातीला त्यांनी थोडे सोने बँकांमध्ये गहाण ठेवले. कुणालाही संशय न आल्याने, गेल्या दोन वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून २० हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँका, पतसंस्थांत दोन कोटींहून अधिकचे दागिने गहाण ठेवले. त्यावर कर्ज घेतल्यावर ते नॉट रिचेबल होत. त्यामुळे बँका दागिन्यांचा लिलाव करत असत.

अखेर बिंग फुटलेमालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, पोलीस निरीक्षक सतीश मयेकर, संतोष गायकर, धीरज कोळी यांच्यासह फौजदार आणि अंमलदारांनी अधिक तपास करत या टोळीचे बिंग फोडले.

कुटुंबीयांचाही सहभागसोनी बंधू हे कुटुंबासी राहतात. त्याचा एक भाऊ सीए आहे. पत्नी, अन्य नातेवाइकांनाही याबाबत माहिती होती. पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान नीतू अंधेरीत राहते. ती कॉलसेंटरमध्ये नोकरीला आहे. तिने ७० लाखांच्या दागिन्यांवर कर्ज घेतल्याचे समोर आले. तर, प्रशांत पवईत राहतो.

या बँकांमध्ये ठेवले दागिने गहाण कोटक महिंद्रा बँक, आयआयएफएल, यस, महानगर, सीएसबी, डीसीबी, फेडरल, मुंबई, स्टेट बँक आॅफ इंडिया, सांगली सहकारी पतपेढी, ग्रेटर बँक, जनसेवा बँक, केएनएस, मणप्पूरम गोल्डसह विविध वित्तीय संस्थांमध्ये या मंडळींनी दागिने गहाण ठेवले आहेत.

बँकांना सतर्कतेचा इशाराबँकांमध्ये सोने गहाण ठेवण्याच्या प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे. अशा अनेक टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता आहे. हॉलमार्क, त्याला घासून पाहून दागिने खरे असल्याचा अंदाज बांधू नये. त्यात लिलावातून दागिने घेताना व्यापाऱ्यांनी शहानिशा करावी, असे मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले.

असे आले प्रकरण उघडकीसलिलावातूनच वाकोला येथील रहिवासी असलेले प्रणित जाधव (२२) यांनी १ लाख ६४ हजार ९३९ रुपयांचे दागिने खरेदी केले. पुढे चौकशीत हे दागिने बनावट असून त्यावर बनावट हॉलमार्कचा वापर केल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यानुसार, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, मालमत्ता कक्षाने तपास सुरू केला.

अशी बनली गँगसोनी बंधू तसेच अन्य आरोपी यापूर्वी एकाच इमारतीत राहायचे. त्यातून त्यांची ओळख झाली. याच ओळखीचा फायदा पुढे फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Goldसोनं