शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तोतया आय ए एस अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात; पंतप्रधान कार्यालयात काम करत असल्याचे सांगून फसवणूक

By विवेक भुसे | Updated: May 31, 2023 11:24 IST

पंतप्रधान कार्यालयात काम करीत असल्याचे सांगून जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या संरक्षण घेऊन फिरणार्‍या गुजरातच्या एका तोतयाचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. त्यानंतर हा दुसरा प्रकार समोर आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी असल्याचे सांगून गोपनीय काम करीत असल्याचे सांगणारा पोलिसांच्या चौकशीत तोतया निघाला. गेल्या चार पाच वर्षांपासून तो आय ए एस अधिकारी असल्याचे सांगून पंतप्रधान कार्यालयात दिल्लीला कामाला असल्याचे सांगत फिरत होता. यापूर्वी त्याने धुळे येथे अशाच प्रकारे फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पंतप्रधान कार्यालयात काम करीत असल्याचे सांगून जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या संरक्षण घेऊन फिरणार्‍या गुजरातच्या एका तोतयाचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते. त्यानंतर हा दुसरा प्रकार समोर आला आहे. 

वासुदेव निवृत्त तायडे (वय ५४, रा. रानवारा रो हाऊस, तळेगाव दाभाडे) असे त्याचे खरे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ ने त्याला अटक केली आहे.याबाबतची माहिती अशी,  बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेचा औंध येथे २९ मे रोजी सकाळी कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी रुग्णवाहिका  पाठविण्याचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमाला विरेन शहा, सुहास कदम, पी के गुप्त व इतर ट्रस्टी व सदस्य उपस्थित होते. त्याला पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपले नाव  डॉ. विनय देव असे सांगितले. ते स्वत: आय ए एस या पदावर असून सध्या त्यांची ड्युटी सेक्रेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय,दिल्ली येथे आहे. ते गोपनीय काम करीत आहे, असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्याकडे  ते कधी आय ए एस झाले, कोठे कोठे काम केले, अशी चौकशी केली. तेव्हा त्यांच्या सांगण्यातील विसंगतीमुळे या पदाधिकार्‍यांना संशय आला. त्यांनी तो पोलिसांकडे बोलून दाखविला.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले की, पदाधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरुन त्यांचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे कबुल केले. तो गेली चार ते पाच वर्षे अशा प्रकारे लोकांची फसवणूक करत फिरतो. धुळे येथेही २००० साली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता, परंतु, त्यात त्याला यश मिळाले नाही. तो काहीही कामधंदा करत नाही. तोतयागिरी करत फिरतो.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर,  पोलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी