शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट योग्यता प्रमाणपत्र देणाऱ्यास ठाण्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:44 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मालवाहू वाहनांना देण्यात येणा-या योग्यता प्रमाणपत्राची बनावट प्रत तयार करून तिची तीन हजारांमध्ये विक्री करणा-याला अटक

ठाणे  -  प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मालवाहू वाहनांना देण्यात येणा-या योग्यता प्रमाणपत्राची बनावट प्रत तयार करून तिची तीन हजारांमध्ये विक्री करणा-या अनिल सचदेव (३२, रा. उल्हासनगर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याला १० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून सात बनावट प्रमाणपत्रे हस्तगत केली आहेत.ठाणे शहर आणि नवी मुंबई, वसई, कल्याण, डोंबिवली भागातील काही ट्रान्सपोर्टच्या व्यावसायिकांना अवजड वाहनांचे आरटीओ कार्यालयाकडून दरवर्षी पासिंग करणे गरजेचे असते. त्यामुळे ते आरटीओतील दलालांची मदत घेऊन ही कागदपत्रे बनवून घेण्याचे काम करतात. अशाच प्रकारे वाहनांचे आरटीओ कार्यालयाची बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस शिपाई भगवान हिवरे यांना तनवीर शेख या तक्रारदाराकडून मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने शेख यांच्या व्यवसायातील दोन टेम्पोंचे ठाणे आरटीओ कार्यालयातीलबनावट फिटनेस प्रमाणपत्रबनवून दिल्याची माहिती समोर आली. याच फिटनेस सर्टिफिकेटची आरटीओकडून गुन्हे अन्वेषण विभागाने सत्यता पडताळणी केली असता,ती बनावट असल्याचे उघडझाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीसनिरीक्षक नितिन ठाकरे यांच्यापथकाने शेख यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणेनगरपोलीस ठाण्यात फसवणुकीचा ६ मे रोजी गुन्हा दाखल केला. बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनविणारा अनिल सचदेव हा ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने ६ मे २०१९ रोजी त्याला अटक केली.आरोपीच्या घरझडतीमध्ये आणखी पाच अशी एकूण सात बनावट वाहन योग्यता प्रमाणपत्रे पोलिसांनी हस्तगत केली. तीन हजारांमध्ये तो अशी बनावट प्रमाणपत्रांची विक्री करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याचे आणखी किती आणि कोण साथीदार आहेत, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक