शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

वाहन चालविण्याचा बनावट परवाना देणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 19:54 IST

बनावट परवाना घेऊन फिरणाऱ्या लोकांची शहरात एक साखळीच असून, अशा लोकांची संख्या ४० च्या वर असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

ठळक मुद्देदोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : वाहन चालविण्याचा बनावट परवाना बनवून देणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, कलर प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, लॅपटॉपसह इतर साहित्य त्याच्या ताब्यातून जप्त केले आहे. आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 

भाऊसाहेब साहेबराव लेंडे (३२, रा. हिरापूर, ता. पैठण), शेख एजाज शेख महेमूद (३०, रा. आडूळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बनावट वाहनचालविण्याचा परवाना बनवून देणारे दोन जण मध्यवर्ती बसस्थानकावर येणार आहे, असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन मोरे, पोलीस नाईक भगवान शिलोटे, विलास वाघ, परभत म्हस्के, पो. कॉ. विशाल पाटील, नितीन देशमुख यांचे पथक रवाना झाले. (दि.२५) रोजी प्रवेशद्वारावर सापळा रचला असता भाऊसाहेब साहेबराव लेंडे हे जाळ्यात अडकले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ वाहन चालविण्याचा बनावट परवाना मिळाला.

लेंडे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आडूळ येथे शेख एजाज शेख महेमूद याच्याकडून हा परवाना घेतल्याचे सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी लेंडे यास फोन लावण्यास सांगितले असता, तो शहरातच असल्याचे समजले. त्याला मध्यवर्ती बसस्थानकात बोलवून घेत पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडे सापडलेला परवाना आरटीओ कार्यालयात पाठविला असता तो बोगस असल्याचे आढळून आले. त्या नंबरचा मूळ परवाना हा दुसऱ्याच व्यक्तीकडे असल्याचे समजले. आडूळ येथील एजाजच्या दुकानावर छापा मारून त्याच्या दुकानातील लॅपटॉप, कलर प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, इतर साहित्यासह तीन बनावट तयार परवानेदेखील आढळून आले. ते साहित्य पथकाने जप्त केले. 

मोठी साखळी असल्याचा अंदाजबनावट परवाना घेऊन फिरणाऱ्या लोकांची शहरात एक साखळीच असून, अशा लोकांची संख्या ४० च्या वर असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. २०१७ पासून एजाज याने बनावट परवाने बनविण्यास सुरुवात केली आहे.४अनेक वाहनचालक विशेष प्रशिक्षण न घेता बनावट परवाने बाळगून फिरताहेत. या चालकांनी शासनाची दिशाभूल करून महसूल बुडविला, तसेच अनेकांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कार्डातून माहिती मिळत नाहीआरटीओ कार्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या वाहन चालविण्याच्या परवान्याचा क्रमांक सारथी या संकेतस्थळावर टाकल्यानंतर परवान्यासंदर्भातील आवश्यक ती माहिती मिळते, तसेच कार्डवरील चीपद्वारेही ही माहिती प्राप्त होऊ शकते. मात्र, बनावट परवान्यात हे शक्य होत नाही. परवाना बनावट आहे, हे सर्वसामान्यांच्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनधारकांनी सावध राहिले पाहिजे.- रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटकPoliceपोलिस