शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

बॉयफ्रेंडचा खून, मग तुरुंगात सेक्सची मागणी...१८ वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या 'फेक बार्बी'च्या मागण्या तर पाहा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 21:22 IST

आधी प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि आता तिनं जेलमध्येच एक विचित्र मागणी केली आहे.

आधी प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि आता तिनं जेलमध्येच एक विचित्र मागणी केली आहे. इंग्लंडच्या फुटबॉलपटूची हत्या करणारी इंग्लिश मॉडेल अबीगेल व्हाईट हिला गेल्या वर्षी १८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून ती इंग्लंडमधील तुरुंगात आहे. मात्र तुरुंगात या मॉडेलच्या विचित्र मागण्यांमुळे तुरुंग प्रशासन अडचणीत आलं आहे.

प्रियकराच्या हत्येनंतर तुरुंगात सेक्सची मागणीफेक बार्बी म्हणून प्रसिद्ध असलेली ही मॉडेल इंग्लंडमधील २२ वर्षीय फुटबॉल खेळाडू ब्रॅडली लुईससोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनाही तीन मुलं आहेत, मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये 'फेक बार्बी'नं किचनमधील ७ इंचाच्या चाकूनं प्रियकरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खरंतर लुईसला या मॉडेलपासून फारकत घ्यायची होती, पण अबीगेल यासाठी तयार नव्हती.

फेक बार्बीला सुनावली गेली १८ वर्षांची शिक्षाअबीगेल व्हाईटविरोधात लुईसच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात अनेक महिने खटला चालला. चौकशी झाली. लुईसच्या कुटुंबीयांनीही अबीगेलवर हत्येचा संशय व्यक्त केला आणि अखेर न्यायालयाने लुईसला दोषी ठरवलं. अबीगेल म्हणाली की ती फक्त तिच्या प्रियकराला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती आणि चुकून त्याचा मृत्यू झाला. लुईसच्या हत्येप्रकरणी मॉडेलला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून ती तुरुंगात आहे.

फेक बार्बीची आहे लाखोंची कमाईआश्चर्याची गोष्ट म्हणजे अबीगेल तुरुंगातूनही लाखो रुपये कमावते. ती ओन्ली फॅन्स या अॅडल्ट साइटवर तिचे फोटो अपलोड करते आणि तिथून ती लाखो रुपये कमावते. ओन्ली फॅन्स ही इंग्लंडची एक प्रसिद्ध वेबसाइट आहे ज्यामध्ये १८ वर्षांवरील लोकांची नोंदणी केली जाते. ओन्ली फॅन्समध्ये अबीगेलचे फोटो खूप प्रसिद्ध आहेत. २०२२ मध्ये या मॉडेलने तिच्या काही फोटोंमधून ५० लाखांपेक्षा जास्त कमाई केली होती.

तुरुंग प्रशासनाकडे केली विचित्र मागणीपाच महिने तुरुंगवास भोगल्यानंतर आता ही 'फेक बार्बी' पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या मॉडेलने तुरुंग प्रशासनाकडे चक्क तुरुंगात सेक्सची मागणी केली आहे. सेक्स ही शारीरिक गरज असून ती तुरुंगातही पूर्ण व्हायला हवी, असं या मॉडेलचं म्हणणं आहे. कारागृहातील इतर अनेक मुलींशीही याबाबत बोलून त्यांचंही तिनं सहकार्य मागितलं आहे. आता या तुरुंगात बंद असलेल्या आणखी अनेक मुलीही 'फेक बार्बी'च्या समर्थनात पुढे आल्या आहेत.

रात्री कारागृहात स्त्री-पुरुषांना एकत्र ठेवावंअबीगेलने म्हणाली की आता ती १८ वर्षांच्या शिक्षेसाठी तुरुंगात आहे, तेव्हा महिला कैद्यांना त्यांच्या साथीदारांसोबत रात्र घालवण्याची परवानगी द्यावी, असे तिच्या मनात आले. कारागृहातच महिला व पुरुषांना रात्री एकत्र राहण्याची व्यवस्था असावी, अशी मागणी पहिल्यांदाच समोर आल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. कैद्यांच्या कुटुंबीयांना दिवसा भेटण्याची मुभा असली तरी कारागृहात तशी सोय नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी