शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 16:35 IST

चंद्रेश नरसी पीर असे या भोंदू बाबाचे नाव असून तो डोंबिवलीत राहतो.

ठळक मुद्दे कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदू बाबाचा गोरख धंदा सुरू होता. या महिलेकडे पूजेसाठी 25 हजार रुपये मागत याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र -तंत्राने तुमचे नुकसान करू अशी धमकीही दिली.

कल्याण - तुझ्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असून तुझ्या घरच्यांचा तुला त्रास असल्याचे सांगत महिलांचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 354, 506, 34 यासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट -अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. चंद्रेश नरसी पीर असे या भोंदू बाबाचे नाव असून तो डोंबिवलीत राहतो. कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदू बाबाचा गोरख धंदा सुरू होता. मोहना येथे राहणारी एक महिला आपल्या चुलत बहिणीसोबत पतपेढीच्या कामासंदर्भात याठिकाणी गेली होती. त्यावेळी या भोंदू बाबाने "तुझ्यावर चुडेल आहे, ती मी काढून देतो, तुझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत, तुझ्या घरच्या लोकांचा त्रास आहे असे सांगत सिगारेटचा धूर या महिलेच्या चेहऱ्यावर सोडला. त्यानंतर महिलेला सेंट लावण्याच्या बहाण्याने शरिरावर हात फिरवला. त्यानंतर या महिलेकडे पूजेसाठी 25 हजार रुपये मागत याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र -तंत्राने तुमचे नुकसान करू अशी धमकीही दिली. मात्र त्याला न जुमानता या महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरात जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी पूजेचे साहित्य, टाचण्या, दिवे आदी साहित्य आढळून आले. तसेच काही नागरिकही आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन या बाबाकडे आल्याचे दिसले. रिक्षात किंवा बाहेर वावरताना ज्या व्यक्ती आपल्या समस्यांबाबत चर्चा करत असतील अशा लोकांना ते हेरत आणि त्यांना पुन्हा हीच पट्टी पढवत असत आणि आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहितीही उपायुक्त पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच लोकांनी अशा प्रकारच्या भोंदू बाबांवर अजिबात विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसWomenमहिलाkalyanकल्याण